उपेक्षित समूहाची भव्य राजकीय परिषद २०२३


अनेक वर्ष उपेक्षित वंचित समूहाला राजकीय पटलापासून येथील प्रस्थापित राजकारण्यांनी दूरच ठेवले . उपेक्षित घटकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेवून वंचित दूर कसे राहतील हे पाहिले जाते. 

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था  विधानसभा  लोकसभा आदि निवडणुकीत वंचित समूह कुठे आहे हे तपासण्याची वेळ आली आहे . नको ते लोक आपणांस चुकीच्या मार्गाने घेवून जातील  याची माहिती करून घेण्यासाठी  परिषदेचे आयोजन बुधवार दि 15 फेब्रुवारी 23 रोजी दुपारी 2ते 9 या वेळात डॉ . बाबासाहेब आंबेडकर रोड 

भावसार सभागृह 

परेल रेल्वे वर्कशॉपच्या समोर  नरेपार्क मैदानच्या जवळ 

मुंबई येथे करण्यात आले आहे .

सध्याची जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे तिचा वाईट परिणाम उपेक्षित समुहाच्या घटकांसोबत होत आहे . या चर्चेतून आपणास नविन पर्याय उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम उपेक्षित समाज व समाजाच्या विविध सामाजिक संघटना  पक्ष  संस्था यामध्ये सामिल होत आहेत सर्व वंचित समुहानी यामध्ये सामिल व्हावे असे आग्रहाचे आवाहनअशोकराव आल्हाट जनहित लोकशाही पार्टी तथा भारतीय लहू शक्ती संस्थापक / राष्ट्रीय अध्यक्ष यांनी केले आहे यात सहभागी पक्ष 

आणि संघटना  भारतीय लहुजी सेना 

लोक स्वराज्य आंदोलन 

मादिगा संघर्ष समिती 

जनता क्रांती दल  भारतीय भटके विमुक्त  आदिवासी  ओबीसी  संघर्ष महासंघ  बंजारा क्रांती सेना  बहुजन क्रांती पक्ष  महाराष्ट्र विकास आघाडी आदि पक्ष व संघटना सामील आहेत

अधिक माहितीसाठी  ७७३८००३३३५३ संपर्क करा.

रिपोर्टर

  • Live Maharashtra
    Live Maharashtra

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Live Maharashtra

संबंधित पोस्ट