Breaking News
ज्युनियर कॉलेज स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ मुंबईतर्फे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज-वडाळा यांच्या सहकार्याने आयोजित भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर चषक आंतर ज्युनियर कॉलेज टी-२० क्रिकेट स्पर्धेत महर्षी दयानंद-एमडी कॉलेजने सलामीची लढत जिंकली. एमडी कॉलेजने निर्मला कॉलेजचा ८ विकेटने पराभव करतांना आर्यन हुले, आयुष बिडवाई इंदल पटेल कौस्तुभ नाईक चमकले. स्पर्धेचे उद्घाटन डॉ. आंबेडकर कॉलेजच्या प्राचार्या डॉ. जयश्री अय्यर असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. दिलीप मस्के सचिव पी.पी.पाटील मनोज पाटील ए.एन.कुंवर शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत माटुंगा जिमखाना येथे संपन्न झाले.
प्रथम फलंदाजी करताना निर्मला कॉलेजच्या फलंदाजांना एमडी कॉलेजच्या इंदल पटेल (२९ धावांत ३ बळी) कौस्तुभ नाईक (२८ धावांत २ बळी) आदी गोलंदाजांनी स्वैर फटकेबाजी करू दिली नाही. परिणामी निर्मला कॉलेजला २० षटकात ७ बाद ११२ धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. सलामीवीर विकल्प शेट्टी (२५ चेंडूत २१ धावा) मोहमद कैफ (१७ चेंडूत १५ धावा) आर्यन सन्नाके (१८ चेंडूत १५ धावा) सनिल गडकरी (१७ चेंडूत १५ धावा) यांनी छान फलंदाजी केली. प्रत्युत्तरादाखल सलामीवीर आर्यन हुले (२४ चेंडूत नाबाद ३६ धावा) व आयुष बिडवाई (११ चेंडूत नाबाद ३५ धावा) यांच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे एमडी कॉलेजने ८.४ षटकात २ बाद ११६ धावा फटकावून विजय संपादन केला. स्पर्धेत एकूण ३६ ज्युनियर कॉलेज क्रिकेट संघ सहभागी झाले आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra