गझल व हायकू मार्गदर्शन कार्यशाळा



कोकण मराठी साहित्य परिषद मुंबई जिल्ह्याच्या वतीने नुकतीच गजल आणि हायकोर्ट कार्यशाळा घेण्यात आली ही कार्यशाळा सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत  नवोदित लेखक कवींसाठी विनाशुल्क गझल व हायकू लेखनतंत्र मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन नॅशनल लायब्ररी बांद्रा  पश्चिम येथे केले होते. उपस्थित पाहुण्यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने कार्यशाळेची सुरुवात झाली. कोमसाप मुंबई जिल्हाअध्यक्ष लता गुठे यांनी उपस्थित पाहुण्यांचे सत्कार केले. कोमसाप केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा पार पडली. प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल लायब्ररीचे प्रमुख कार्यवाह प्रमोद महाडिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोमसाप मुंबई जिल्हा कार्यवाह डॉक्टर कृष्णा नाईक यांनी केले. लता गुठे यांनी त्यांच्या मनोगतातून कार्यशाळेचा उद्देश आणि ही कार्यशाळा किती उपयुक्त आहे याविषयी भाष्य केले. 

     प्रथम हायकू लेखन यावर मार्गदर्शन मेघना साने यांनी केले. आणि वृत्तलेखन यावर मधुमंजरी गटणे यांनी उत्तम मार्गदर्शन केले. बायकोची सुरुवात कशी झाली? आणि हायकू विषयी सविस्तर माहिती देऊन हायकूचे तंत्र उदाहरणासह समजावून सांगितले. त्यानंतर गझलची सुरुवात वृत्तलेखनाने लेखिका मधुमंजिरी गटणे यांनी केली वृत्तलेखनाचा गजर लिखाणासाठी कसा उपयोग होतो वृत्त म्हणजे काय वृत्ताचे प्रकार प्रत्येक वृत्ताचे वेगळेपण हे समजावून सांगितले. सुप्रसिद्ध गझलकार प्रतिभा सराफ व ज्येष्ठ गजलकार सदानंद डबीर यांनी गझल लेखनाविषयी मार्गदर्शन केले. शब्दाला शब्द जोडून गझल होत नाही तर गजनेमध्ये भावन निर्माण झाला पाहिजे. प्रत्येक शेर जरी स्वतंत्र असला तरीसुद्धा शेरांमध्ये साधर्म्य असायला हवे" फक्त वृत्त, मात्रा, यमक या सर्व गोष्टी बरोबर असल्या तरी ती गझल होत नाही. असे ज्येष्ठ गझलकार सदानंद डबीर यांनी आपले विचार व्यक्त केले. 

      या कार्यशाळेला कवी लेखकांचा खूप छान प्रतिसाद मिळाला. तसेच सकाळी चहा नाश्ता, दुपारी जेवण संध्याकाळी चहा बिस्कीट कशी उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यशाळेला 70 कवी, लेखक व कोमसापचे पदाधिकारी उपस्थित होते‌. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या प्रभू यांनी केले.

शेवटी कार्यशाळेस सहभागी लेखक कविंना प्रमाणपत्रे देण्यात आली.

रिपोर्टर

  • Live Maharashtra
    Live Maharashtra

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Live Maharashtra

संबंधित पोस्ट