Breaking News
कृपया प्रसिद्धीसाठी
कामगारांना किमान १० हजार रुपये पेन्शन मिळालीच पाहिजे!इंडियन नॅशनल टेक्स्टाइल कर्कर्स फेडरेशनच्या बैठकीत उपाध्यक्ष गोविंदराव मोहिते यांची मागणी
मुंबई:दि.१७: पेन्शनधारक का
मगारांना आज किमान दहा हजार रुपये तरी मासिक पेन्शन मिळालीच पाहिजे,अशी जोरदार मागणी इंटकच्या इंडियन नॅशनल टेक्स्टाइल वर्कर्स फेडरेशनच्या सुरत येथे पार पडलेल्या बैठकीत फेडरेशनचे उपाध्यक्ष गोविंदराव मोहिते यांनी केली आहे.
इंडियन नॅशनल टेक्स्टाइल वर्कर्स फेडरेशनची नुकतिच ही सुरत येथे बैठक पार पडली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी फेडरेशनचे अध्यक्ष नौशाद देसाई होते.
वाढीवपेन्शन संदर्भात सध्या कामगार वर्गात सर्वत्र उलट सुलट चर्चा सुरु आहे.तोच धागा पकडून गोविंदराव मोहिते आपल्या प्रास्ताविक भाषणात पुढे म्हणाले,कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अंतर्गत सन १९९५ पासून कामगारांना ही पेन्शन योजना लागू आहे.त्या वेळी ज्या पेन्शन धारकांना १००० रु.पेन्शन सुरू होती.परंतु आता २७ वर्षे उलटून गेली तरी तेवढीच पेन्शन मिळते आहे.महागाई वाढीने वर्षोनुवर्षे उच्चांक गाठला आहे,तेव्हा त्या कामगाराने निवृत्तीचाकाळ १००० रू.मासिक पेन्शन मध्ये जगणे शक्य आहे का? या गोष्टीचा विचार करून मासिक पेन्शनमध्ये सरकारने वाढ केली पाहिजे,असे गोविंदराव मोहिते यांनी बैठकीत सांगितले.
फेडरेशनच्या कार्यकारिणीच्या बैठकीसाठी महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश,दिल्ली,उत्तर प्रदेश आदी राज्यांतील कार्यकारीणी सदस्य उपस्थित होते.
बैठकीत पेन्शन योजनेवर विस्तृत चर्चा करतांना म्हटले आहे,सदर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने कोश्यारी कमिटीची नियुक्ती केली होती.त्या कमिटीच्या शिफारसी त्वरीत लागू करण्यात याव्यात.
केंद्र सरकार कडून ४४ कामगार कायदे रद्द करुन, त्याचे 'फोर लेबर कोड बिलात' रुपांतर करण्यात आले आहे.कामगार वर्गाला जाचक तर मालक शाहिला तारक ठरलेले हे सुधारीत कायदे मागे घ्यावेत,अशी फेडरेशनच्या बैठकीत मागणी करण्यात आली आहे.या बदललेल्या कामगार अहितकारक कायद्यांना कामगार संघटना संयुक्त कृती समितीने कडाडून विरोध केला आहे.
आज किमान पगारा इतकेही कंत्राटी कामगारांना वेतन मिळत नाही.त्यांचे सरळ सरळ शोषण सुरू आहे,तेव्हा ही कंत्राटी पध्दती नष्ट करावी,अशी इंडियन नॅशनल टेक्स्टाइल फेडरेशनच्या बैठकीत मागणी करण्यात आली आहे.फेडरेशनचे खजिनदार जी.बी.गावडे यांनी आभार मानले.बैठकीला श्यामसुंदर यादव,उर्मिला राणा, रमेश वस्त तर मुंबईतून निवृत्ती देसाई,बजरंग चव्हाण,साई निकम, सूरेश मोरे आदी कार्यकारिणी सदस्या उपस्थित होते.त्यांनीही बैठकीत भाग घेतला.
*
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra