मिस्टर इंडिया उदय 2023 या प्रतिष्ठेच्या शरीर सौष्ठव स्पर्धेत अभ्युदयनगरच्या संतोष बंगेरा यांना ब्राँझ पदक!



संतोष बंगेरा हे मूळचे मंगलोरचे पण मुंबईमधील अभ्युदयनगर या मराठमोळ्या वसाहतीत लहानाचे मोठे झाले.म्हणूनच ते अस्सखलित मराठीत संभाषण करतात.

एन.के.इ.एस.या वडाळ्याच्या शाळेत शिकल्यानंतर एस.आय. डब्ल्यू. एस. महाविद्यालयामधून वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली.

 वडीलांचं छत्र हरपल्यानंतर त्यांच्या कॉटनग्रीन स्टेशन समोरील ज्यूस सेंटर आणि पान शॉपच्या व्यवसायात बंगेरा यांनी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलं. स्वभावातील सच्चेपणा प्रामाणिकपणा अविश्रांत मेहनत आणि हसतमुख बोलणं या स्वाभाविक गुणांमुळे या व्यवसायात चांगला जम बसवण्यात ते यशस्वी झाले.

 व्यायामाची लहानपणापासून आवड असल्यामुळे काळाचौकीच्या  यंग दत्ताराम व्यायामशाळेत त्यांनी व्यायामाचे धडे घेतले. तेथे मिस्टर इंडिया टायटल मिळवणारे वसंत सॅलियन प्रशांत नारकर आणि योगेश वायंगणकर यांच्या तज्ञ मार्गदर्शनाखाली बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी तयारी केली. या सगळ्याचा परिणाम म्हणून आज साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या संतोष बंगेरा यांनी मिस्टर इंडिया उदय 2023 या सांगली येथे झालेल्या स्पर्धेत तसेच मुंबई उदयश्री या स्पर्धेत रौप्य पदकावर आपलं नाव कोरले ही अभिमानाची गोष्ट आहे.

तसेच महाराष्ट्रश्री उदय या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांनी नामांकन प्राप्त केले आहे.

संतोष बंगेरा यांच्या कन्या केनिशा व क्रिशिका दोघी मॅरेथॉन स्पर्धा विजेत्या आहेत. आणि वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्या आजसुद्धा सराव करत त्यांच्या क्षेत्रात यश मिळवत आहेत.

 पण या सर्व यशाचे श्रेय संतोष बंगेरा हे त्यांच्या पत्नीला बिंदू बांगेरा यांना देतात ते म्हणतात तिच्या पाठिंब्यामुळेच मी आज हे यश मिळवू शकलो आहे.

रिपोर्टर

  • Live Maharashtra
    Live Maharashtra

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Live Maharashtra

संबंधित पोस्ट