श्रीस्वामी समर्थ मठ परेल येथे लोटला लाखो भक्तांचा जनसागर...


श्रीस्वामी समर्थ मठ परेल यांच्या वर्धापनदिनाचं औचित्य साधत अक्षयतृतीयेचा साडेतीन मुहूर्तापैकी एक अत्यंत पवित्र असा शुभमुहूर्त साधत श्रीस्वामी समर्थ मठाच्या व्यवस्थापनाच्या वतीने सचिन शेट्ये यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली भक्तिगीतांचा श्रवणीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  सुमारे दहा हजाराहून अधिक भक्तांनी यावेळी आयोजित केलेल्या महाप्रसादाचा लाभ घेतला.

या सोहळ्याला खासदार अरविंद सावंत. डॉ जगन्नाथराव हेगडे. आमदार अजय चौधरी. बाळा नांदगावकर. रोहिदास लोखंडे यांनी उपस्थिती दर्शवली आणि या सोहळ्याचा आनंद मनापासून लुटला.

या सोहळ्याला टिंग टिंग ऑनलाईन चे सिईओ उदय पवार  आणि मित्रपरिवार तसेच विविध पक्षांचे मान्यवर नेते संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुप्रसिद्ध गायिका पद्मजा फेणाणी आणि सहकलाकारानी सादर केलेल्या या भक्तिगीतांच्या सागरात अवघा प्रेक्षकवृंद आनंदाचे डोही आनंद तरंग असा अनुभव घेताना दिसत होता.

रिपोर्टर

  • Live Maharashtra
    Live Maharashtra

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Live Maharashtra

संबंधित पोस्ट