Breaking News
एखाद्याचे आयुष्य किती खडतर असतं हे नमिता चाकणे या महिलेच्या जीवनाकडे पाहिलं तर सहज लक्षात येतं.खरंतर ही एक जिद्दी महिलेची संघर्षकथा आहे. दिवसभर काम करून पुन्हा रात्रीच्या वेळी एकट्या महिलेने इतर मजुरांच्या सोबत कष्ट करून अंगावर घेतलेलं काम पूर्ण करायचं हे धाडसाचं तसंच कौशल्याचं काम आहे.रात्रीच्या वेळी फेरफटका मारत असताना काही मजूर रस्त्यावर रोड मार्किंग चे काम करत असताना दिसले आणि एक महिला यांना सूचना देत मार्गदर्शन करीत होती म्हणून चौकशी केली असता तिच्याकडून तिच्या जीवन संघर्षाची हृदय द्रावक कहाणी समोर आली. चौकशी केली असता असं कळलं की या महिलेचा पती कोरोनामुळे मृत्यू पावला होता .त्यामुळे त्याच्या कुटुंबाची जबाबदारी आपसुक या महिलेवर आली आणि इतर कोणाची साथ नसतानाही तिने हे शिवधनुष्य जिद्दीने पेललं आहे.
हडपसर पुणे येथे राहणारी नमिता चाकणे ही पुण्यावरून मुंबईला येऊन दिवस रात्र इथे काम करते. सोबत मुलाबाळांना पण ती सांभाळत असते .त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी तिच्यावर आहे. आणि ती ही जबाबदारी जिद्दीने पार पाडत आहे.
अशा अनेक नमिता समाजात असतील पण त्यांचे कष्ट आणि जिद्दीच्या कथा समाजापर्यंत पोहोचत नाहीत या महिलांच्या या धाडसी आणि जिद्दी कर्तुत्वाला मानाचा मुजरा आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra