Breaking News
मुंबई- दरवर्षी १ मे जगभरात आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणुन साजरा केल्या जातो जगाचा आधारस्तंभ असणारा हा कामगाराची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बेकार होतांना दिसत आहे सर्वच कामगार क्षेत्राची आज हानी होत आहे याचे सामाजिक भान ठेवून मुंबई मध्ये कार्यरत असलेल्या ऑन कॉन्ट्रॅक्ट / थिर्ट पार्टी पेरॉल वर असलेले ऑन फील्ड स्टाफ यांच्या करिता कुबेरगल्ली सार्वजनिक गणेशत्सव मंडळातील कार्यकर्ते प्रसाद कराड यांच्या वतीने एक दिवसीय उपोषण आंदोलन करण्यात आले. कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरीत असलेले हे आंदोलन नाही केवळ आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो त्यासाठी हा प्रयत्न करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले अतिशय कमी वेळात मोठा उद्देश ठेवून हे आंदोलन करण्यात आले कामगारांप्रती आदर असणाऱ्या सर्वांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून या आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवल्याबद्दल मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले
आज जगाचा विचार केला तर ८० टक्के लोक कामगारांमध्ये मोडतात यात अनेक क्षेत्रातील कामगार वर्ग दीसुन येतात. शेतीतील कामगार असो कारखाण्यातील कामगार असो किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील कामगार असो त्याची अत्यंत दयनीय अवस्था दिसून येते आज विकसीत विकसनशील गरीब या संपूर्ण देशातील कामगारांवर जिवन-मरणाचा प्रश्न उद्भवत आहे त्यांच्या प्रती सहानुभूती व्यक्त करण्याकरिता आज कामगार दिनी परेल व्हिलेज या ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते यामध्ये प्रसाद कराडे, सिध्देश चव्हाण कल्पेश तांदळे संतोष शिंदे दिनेश बुडबाडकर पर्वण गुरव प्रथमेश शिंदे आशिष भुरावणे अभिषेक गुरव अभिषेक कारंडे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्ते तसेच इतर सामाजिक भान असलेल्यांची लक्षणिय उपस्थिती होती
या कार्यक्रमास महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग 204 लालबाग - परळ चे शाखाअध्यक्ष श्री. प्रशांत प्रकाश पाटील उपशाखाअध्यक्ष श्री .दिवाकर पवार तसेच मनसे विधार्थी सेना संपर्क अध्यक्ष संगमेश्वर सिद्देश केळस्कर यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले त्याबद्दल मंडळातील कार्यकर्त्यांनी पक्षाचे आभार मानले
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra