Breaking News
जय जवान जय किसान प्रमाणेच जय कामगार हा नारा सुद्धा प्रत्येकाच्या मनामनात रुजला पाहिजे. इथल्या भूमिपुत्राचा गौरव झाला पाहिजे असा विचार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कामगार मेळाव्यात व्यक्त केला. भारतीय कामगार सेनेची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. माजी केंद्रीय मंत्री तथा भारतीय कामगार सेना अध्यक्ष अरविंद सावंत कार्याध्यक्ष अजित साळवी सरचिटणीस सचिन भावने संयुक्त सरचिटणीस संजय कदम तसेच कामगार सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकारीणी सदस्य कार्यकर्ते त्याचप्रमाणे मुंबई विमानतळ युनिट सदस्य व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कामगारांच्या न्याय हक्कासाठी त्या वेळी युनियन लढत होत्या. त्यात कामगार सेना अग्रेसर होती. कामगारांच्या न्यायासाठी प्रसंगी मालकवर्गासोबत दोन हात करण्याचे कामही सेनेने केले आहे. कामगार जगला पाहिजे. त्यावेळेस युनियन कामगारांसाठी लढत होत्या. आता तो लढाच संपला आहे. कारण आता सर्वत्र कंत्राटी पद्धत बोकाळत असल्याने कामगार क्षेत्र असंघटीत होत आहे. आता सरकारच कंत्राटदाराचे लाड करीत आहे आणि त्याचा मलिदा खात आहे. मात्र हे दिवस देखील जातील. नव्हे आपण पुन्हा जुने दिवस आणू असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थितांना दिला.
जय जवान जय किसान यासोबत शिवसेनाप्रमुखांनी जय कामगार अशी घोषणा दिली होती. कारण देशाच्या जडणघडणीत कामगार वर्गाचेही योगदान असल्याची जाणीव शिवसेनाप्रमुखांना होती. कामगारांमुळेच आज संघटना आणि त्यांचे नेते आहेत. मात्र नेत्यांमधील किती जणांना कामगारांचे जीणे माहिती आहे. एसी रुममध्ये बसून केवळ कामगारांच्या समस्यावर चर्चा करायची आणि निर्णय घ्यायचे यामुळेच आज कामगार क्षेत्र खिळखिळे झाले असून ही कामगारांच्या मनात धगधगणारी आग इथल्या सत्ताधाऱ्यांना जाळल्याशिवाय राहणार नाही. असेही उद्धव ठाकरे यांनी विद्यमान सत्ताधाऱ्यांना सुनावले.
भारतीय कामगार सेना म्हणजे शिवसेना वडाची मजबुत पारंबी आहे. कधी रणांगणातून पळणार नाही हा शिवसैनिकाचा बाणा आहे! विद्यमान राजकीय परिस्थितीमध्ये आपले काही गद्दार उंदीर इकडेतिकडे पळत आहेत पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी एकनिष्ठ असलेला भारतीय कामगार सेनेचा निष्ठावंत मावळा कुठेही सरकला नाही! आणि सरकणारही नाही असे आश्वासन भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सामंत यांनी दिले.
कर्जमाफी नाही शेतकरी काय गुन्हा करतो का माफी मागायला? त्याला कर्जमुक्त करायच हा विचार करणारे नेतृत्व 'उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ! घार हिंडते आकाशी तिचे लक्ष पिल्लापाशी असे नेतृत्व उद्धवजी बाळासाहेब ठाकरे! कोरोना काळात उद्धवसाहेबांनी केलेले काम अवघ्या जगाला दिसले, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला दिसले, परंतु दिसले नाही ते फक्त 'भारतीय जनता पार्टी'ला! ते आंधळे आहेत बहिरे आहेत मुके आहेत हे मला माहित नाही परंतु हे जाणीवपूर्वक केले जाते! युनियनच्या अधिवेशनासाठी वृत्तवाहिन्या आल्या नसत्या पण का आल्या? एकच माणुस आहे रॉक ऑफ जिब्राल्टर असा इंग्रजी शब्द आहे हा सह्याद्री हिमालयासारखा उभा आहे! आणि त्या सह्याद्रीवर आघात करण्यासाठी सर्वजण येत असतात.
दावोसला गेल्यावर आदित्यसाहेबांचा आम्हांला केवढा अभिमान वाटला. जगातील पत्रकारांनी दखल घेतली एका 32 वर्षीय तरुणाची जगातील तरुणांनी दखल घेतली त्यांच्या व्हिजनची त्यांच्या विद्वत्तेची! मरणात खरोखर जग जगते या उक्तीनुसार उद्योग जगला तर कामगार जगेल तो उद्योग जगविण्याचे आणि कामगारांच्या आयुष्यात भरभराट करण्याचे काम माझी भारतीय कामगार सेना करते याचा मला अभिमान वाटतो! असे गौरवोद्गार सावंत यांनी काढले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra