मनसे उन्हाळी क्रिडा प्रशिक्षण शिबिर


उन्हाळा सुरु झाला की विद्यार्थी आवर्जून वाट पाहत असतात ते म्हणजे सुट्ट्या लागायची  हा काळ प्रत्येक मुलासाठी आनंदाचा काळ असतो मात्र पालकांच्या दृष्टीने काहीसा आनंदाचा तर आपल्या मुलांना सुट्टीमध्ये गुंतवून कसे ठेवावे या विचाराने काहीसा चिंतेचा असा संमिश्र काळ असतो  सोशल मिडियाच्या आक्रमणामुळे सर्व मैदानी खेळ सध्याची पिढी विसरत चालली आहे. यावर उपाय म्हणून  मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या निर्देशनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शन मनसे नेते बाळा नांदगावकर साहेब, विभाग अध्यक्ष संतोष नलावडे यांच्या सहकार्य, स्थानिक शाखाअध्यक्ष निलेश इंदप यांच्या संकल्पनेतून तसेच त्यांच्या कल्पक आयोजनातुन करण्यात आले होते. शिवडी विधानसभा क्षेत्रात लालबाग परळ प्रभाग २०३ मनसेच्या वतीने  दिनांक २५ ते ३० एप्रिल दरम्यान ५ ते १४ वयोगटातील मुलांसाठी हे प्रशिक्षण शिबिर होते. रोज सायंकाळी ७ ते ९ या वेळात परळच्या कामगार मैदानात पार पडलेल्या शिबिराला परिसरातील मुलांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आयोजक मनसे शाखा अध्यक्ष निलेश रमेश इंदप यांनी आभार व्यक्त केले  क्रिडा प्रकारातील विविध मैदानी खेळांचे प्रशिक्षण यावेळी मुलांना देण्यात आले या शिबिरात परिसरातील अनेक मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता   बहुतेकदा मोठ्या सुट्ट्यांमुळे मुलांमध्ये कंटाळवाणेपणा येण्याची शक्यता असते म्हणूनच पालकांनी मुलांना या काळात कृतीशील आणि विविध उपक्रमात गुंतवून ठेवणे आवश्यक आहे. या सुट्ट्या आनंददायी होण्यासाठी मनसेच्या वतीने असे उपक्रम राबवण्यात येत असून यामुळे मुले कृतीशील व निरोगी राहतात. अशी प्रतिक्रिया इंदप यांनी दिली.

रिपोर्टर

  • Live Maharashtra
    Live Maharashtra

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Live Maharashtra

संबंधित पोस्ट