Breaking News
मुंबई दि.२:केंद्र सरकारचे कामगार विरोधी धोरण कामगार वर्गाचे खच्चीकरण करणारे असून फोर लेबर कोड बिल तर मालकांपुढे पायघड्या घालणारे आणि कामगार तसेच कामगार चळवळीचे अस्तित्व धोक्यात आणणारे आहे या विरुद्ध आता रस्त्यावर उतरून कणखरपणे लढण्याचा निर्धार उपस्थित कामगार संघटनांनी काल केला आहे.
कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने काल परेलच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या महात्मा गांधी सभागृहात १मे जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र राज्य वर्धापनदिनाच्या औचित्याने भव्य सभा पार पडली.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या प्रोत्साहनाने आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या सहकार्याने हा समारंभ पार पडला.
सभेमध्ये शेतक री कष्टकरी कामगार आणि महागाईवाढ बेरोजगारीच्या वणव्यात होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला न्याय मिळण्यासाठी कामगार चळवळीने आता राजकीय चळवळ उभी करणे काळाची गरज आहे असे उपस्थित नेत्यांनी म्हटले आले
सर्व कामगार संघटनानी मतभेद विसरून एकजुटीने लढा देण्याची गरज आहे असे स्पष्ट प्रतिपादन कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या नेत्यांनी केले आहे.
तत्पूर्वी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने जागतिक कामगार दिनाच्या औचित्याने सर्व केंद्रीय कामगार संघटनांच्या पुढाकारा ने परेल रेल्वे स्टेशन पूर्व ते राष्ट्रीय मिल मजदुर संघ कार्यालया पर्यंत कामगारांचा भव्य मोर्चा काढण्यात आला.मोर्चामध्ये मोदी हटाव देश बचाव कामगार विरोधी शेतकरी विरोधी जनता विरोधी सरकारचा निषेध असो कामगार एकजुटीचा विजय असो हम सब एक है अशा गगनभेदी घोषणा देत परिसर दणाणून सोडला.या मोर्चाचे रूपांतर नंतर राष्ट्रीय मिल मजदुर संघाच्या सभागृहातील सभेत झाले. या सभेत कामगार नेत्यांनी कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन कामगारांना मार्गदर्शन करताना सांगितले की केंद्रीय कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली यापुढे वर्षभर आंदोलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. तीन महिन्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाविरुद्ध प्रचंड मोर्चा काढला जाईल. शेतकऱ्यांनी एक वर्षभर संघर्ष करून केंद्र सरकारला कायदे मागे घेण्यास भाग पाडले कामगारांनी देखील अशा प्रकारे एकजुटीने लढा दिला पाहिजे.असंघटित कामगारांना संघटित केल्याशिवाय कामगारांना न्याय मिळणार नाही. त्यासाठी संघटित क्षेत्रातील सर्वच कामगार नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करण्याची काळाची गरज आहे असे म्हटले आहे.
कामगार संघटनांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन कामगारांच्या अन्यायावर दाद मागण्याचा या प्रसंगी मनोदय व्यक्त करण्यात आला तळागाळातील सामान्य शेतकरी व कामगारापर्यंत हा संदेश पोहोचवा या साठी जनजागृती करण्यात येणार आहे.
येणाऱ्या २०२४ च्या विधानसभा निवडणु कीमध्ये झोपडपट्टी गल्लीबोळात जाऊन केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध प्रचार करण्याची गरज आहे असे सर्वच कामगार नेत्यांनी या सभेत प्रतिपादिले.
याप्रसंगी महाराष्ट्र एच.एम.एस.चे अध्यक्ष शंकर साळवी जनरल सेक्रेटरी संजय वढावकर खजिनदार निवृत्ती धुमाळ, कार्यकारिणी सदस्य कल्पना देसाई म्युन्सिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव समन्वय समितीचे निमंत्रक कॉ. एम. ए. पाटील इंटकचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते दिवाकर दळवी निवृत्ती देसाई सिटूचे कॉ.विवेक मॉन्टेरो सैहीद अहमद एआयसीसीचे विजय कुलकर्णी आयटकचे कॉ उदय चौधरी कॉ आरमाईटी इराणी कॉ.पी.एम वर्तक आदी मान्यवर कामगार नेत्यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.
महाराष्ट्र इंटकने काळ्या फितीचे आयोजन करुन केंद्र तसेच राज्य सरकारने कामगार विरोधी धोरण अवलंबिले त्या चा निषेध केला.परेल येथील कामगार मैदानावरील हुतात्मा
गिरणी कामगार
बाबू गेणू यांच्या पुतळ्याला गोविंदराव मोहिते यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले आणि स्वातंत्र्य लढ्यातील कामगारांच्या स्मृती जागवल्या
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra