78000 विद्यार्थ्यी प्रशिक्षण योजनेपासून वंचित


मुंबई - सुमंत भांगे या अधिकाऱ्याने मागील वर्षात बार्टीतील 13200 अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना मंजूर असलेले प्रशिक्षण देण्यास नकार दिला पुढील काळाकरिता मंजूरी असलेल्या 78000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळूच नये याकरिता ही योजनाच नासविण्याची शासकीय पद्धतीने सोय केली प्रत्येकाला खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन सरकारला झोपेचं सोंग करता येईल अशी स्थिती निर्माण केली आणि महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या तरुण पिढीचे करिअर घडू नये याची सोय केली  याविरोधात विविध सामाजिक संघटना  प्रशिक्षण संस्था  विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचे मंत्रालयासमोर आझाद मैदान मुंबई येथे 1 मे २०२३ पासून आंदोलन 

२०२२ मध्ये 6000 SC विद्यार्थ्यांचे पोलीस भरतीचे मंजूर असलेले प्रशिक्षण राबविले नाही- राज्यात मात्र पोलीस भरती प्रक्रिया सुरु आहे   2023 मध्ये 9000 विद्यार्थ्यांचे बँक  रेल्वे  एलआयसी ई परीक्षा आणि कॉर्पोरेट व खाजगी क्षेत्रातील परीक्षा आणि इंटरव्यू करिता घेतले जाणारे मंजूर असलेले प्रशिक्षण राबविले नाही  7200 विद्यार्थ्याकरिता 12 जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्र 2 वर्षापासून शासन निर्णय असून देखील अद्याप सुरु केले नाही  एकूण 78000 SC विद्यार्थ्यांच्या विविध प्रशिक्षण योजना नासवल्या  SC मधून निर्माण झालेल्या 30 प्रशिक्षण संस्था दादागिरीने बंद पाडल्या 

ग्रॅज्युएट   पोस्ट- ग्रॅज्युएट होऊन देखील बेरोजगार असलेल्या हजारो अनुसूचित जातीतील तरुणांना प्रशिक्षण वर्गात आणणे   करिअर होण्याच्या वातावरणात टाकणे  पैसे नसलेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे  आता काय करावे अशी मानसिक अवस्था असलेल्या युवा वर्गाला करिअरचे मार्ग दाखविणे असे महत्वाचे कार्य या प्रशिक्षण केंद्रांमार्फत 2012 पासून होत होते.  या सर्व योजना नासवून आणि SC चे प्रशिक्षण केंद्र बंद पाडून पिढी बरबाद करण्याचे काम हे जातीयवादी सरकार आणि जातीवादी सुमंत भांगे या सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याने केलेले आहे  या जातीय द्वेषाच्या विरोधात 1 मे 2023 पासून मंत्रालयासमोर आझाद मैदान मुंबई  येथे आंदोलन सुरु करण्यात येत आहे. यात विविध सामाजिक संघटना   विद्यार्थी   प्रशिक्षण संस्था आणि कर्मचारी सहभागी होत आहेत  तरी सर्व राजकीय पक्षाचे नेते सर्व सामाजिक धार्मिक संघटनात काम करणारे नेते कार्यकर्ते व सर्व विद्यार्थी नेते यांनी या अन्याया विरुद्धच्या लढ्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे

रिपोर्टर

  • Live Maharashtra
    Live Maharashtra

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Live Maharashtra

संबंधित पोस्ट