राष्ट्रीय मिल मजदूर संघांचे एनटीसीवर आंदोलन! खासदार सुप्रिया सुळे आणि अरविंद सावंत यांच्या भेटी मुळे प्रश्न मार्गी लागणार!


     मुंबई दि.२: गेल्या सहा महिन्यां पासूनचा थकीत पगार त्वरित द्या आणि तीन वर्षांपासून बंद असलेल्या एनटीसीच्या गिरण्या त्वरित चालवा  कामगारांचे व्हीआर एसचे २२ ते २३ कोटी रुपये त्वरित द्या या मागण्यांना समोर ठेवून राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच्या आदेशा नुसार आज बेलार्ड पिअर येथील एनटीसी कार्यालयावर  आंदोलन छेडण्यात आले.

    आंदोलनाला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उध्दव ठाकरे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आकस्मित भेट दिल्याने या प्रश्नावर आगडोंब उसळून आला आणि एनटीसी आधिका-यांनी सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी दाखवली आहे    

   खासदार अरविंद सावंत म्हणाले मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मुंबईतील गिरणी कामगारांचे योगदान महत्वाचे ठरले आहे तेव्हा गिरणी कामगार उध्वस्त होता कामा नये राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली गेली तीन वर्षे आंदोलन सुरू आहे,त्या मुळे हा प्रश्न धगधगत राहिला आहे परंतु केंद्र सरकारचा गिरण्या बंद करून कामगारांना देशोधडीला लावण्याचा डाव आहेआज एनटीसीला जवळ जवळ अडीच हजार कोटी रुपये आले आहेत तरीही आठ महिने झाले गिरणी कामगारांना पगार दिला जात नाही आणि या गिरण्या पूर्ववत चालविण्यासाठी पाऊल उचलले गेले नाही तेव्हा संसदेत या प्रश्नावर आपण आवाज उठविणार आहोत असे खासदार अरविंद सावंत म्हणाले 

     राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले की  केंद्र सरकार गिरण्या चालवित नाही आणि कामगारांना मागील पगार दिला जात नाही या गोष्टीचा मी निषेध करते कामगांना पगार मिळणे हा त्यांचा अधिकार आहे तरी आपण कामगारांच्या आंदोलना मागे कायम उभे राहू 

    राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या शिष्टमंडळाने  एनटीसीचे महाव्य वस्थापक यांची भेट घेतली असता त्यांनी थकीत पगार लवकरच दिला जाईल असे आश्वासन दिले आहे खजिनदार निवृत्ती देसाई उपाध्यक्ष अण्णा शशिर्सेकर सुनिल बोरकर सेक्रेटरी शिवाजी काळे यांनी सदर आंदोलनाचे नेतृत्व केलेस़घटनेच्या सर्व सघटन सेक्रेटरींनी आंदोलन यशस्वी करण्यासाठी महत्त्वाचा वाटा उचलला       

   सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी सांगितले की संघटना मागण्या मान्य होईपर्यंत लढत राहील. *"

रिपोर्टर

  • Live Maharashtra
    Live Maharashtra

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Live Maharashtra

संबंधित पोस्ट