Breaking News
मुंबई दि.४ इएसआय अंतर्गत मिळणारा सामाजिक सुरक्षिततेचा लाभ केवळ नोकरीला असे पर्यंतच नव्हे तर निवृत्तीनंतरही कामगारांना विनाअट मिळावयास हवा असे प्रतिपादन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी येथे आपल्या अभिष्टचिंत सोहळ्यला उत्तर देताना येथे केले
राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र इंटकचे सरचिटणीस तसेच अनेक राष्ट्रीय राज्यस्तरीय संस्थांचे नेतृत्व करीत असलेले कामगार नेते गोविंदराव मोहिते यांच्या ७३ व्या वाढदिवसा निमित्ताने नुकताच परेलच्या मनोहर फाळके सभागृहात अभिष्टचिंतन सोहळा पार पडला
संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर संपर्क कार्यक्रमा निमित्ताने मुंबई बाहेर असल्याने त्यांनी या कार्यक्रमाला शुभसंदेश पाठवून श्री.मोहिते यांचे अभिष्टचिंतन केले माजीनगरपाल डॉक्टर जगन्नाथ हेगडे यांच्या हस्ते प्रारंभी गोविंदराव मोहिते यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले त्या नंतर उपस्थित नेत्यांच्या वतीने गोविंदराव मोहिते यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले
इएसआय'या सामाजिक सुरक्षितेवर बोलताना गोविंदराव मोहिते पुढे म्हणाले कामगारांना वैद्यकीय लाभ देणारी अन्य कोणतीही लाभदायक योजना अस्तित्वात नाही मात्र ती आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि खेड्यापाड्यातील असंघटित वेठबिगारां पर्यंत पोहोचावयास हवी तिचे कार्यक्षेत्र विस्तारावयास हवे तरच तिचा हेतू ख-या अर्थाने सफल होईल सध्या काही रक्कम भरून कामगारांना निवृत्ती नंतरही सदर योजना लागू असली तरी त्यासाठी अनेक अटी आहेत पण ही अट दूर करुन निवृत्त कामगार आणि त्यांच्या वारसांना औद्योगिक सोयी सवल तींचा लाभ मिळावयास हवा
केंद्रीय वस्त्रोद्योगाकडे या ना त्या मार्गाने कोट्यावधी रुपयांची धनरांशी गोळा होत असतांनाही एनटीसी गिरण्या पूर्ववत चालविण्यात येत नाहीत किंवा उपासमारीचे जीवन जगणाऱ्या कामगारांचा गेल्या काही महिन्यांपासून थकीत पगार दिला जात नाही,यावर घणाघाती शब्दांत टिका करून गोविंदराव मोहिते म्हणाले,केंद्र सरकार असो किवा राज्य सरकार असो बेरोजगारीच्या प्रश्नावर केवळ वारेमाप घोषणा करून वेळ मारुन नेण्याचे काम करीत आहे, अशा सरकार विरूद्ध कामगारांना आता रस्त्यावर उतरावे लागेल असा आपल्या भाषणात गोविंदराव मोहिते यांनी इशाराही दिला
या प्रसंगी सर्वश्री निवृत्ती देसाई राजन लाड जी बी गावडे आशा आसबे दादा पवार उदय पवार मुकेश तिगोटे नामदेव झेंडे महेंद्र सातोसे यांची गोविंदराव मोहिते यांच्या विविध जीवन पैलुंवर प्रकाश टाकणारी भाषणे झाली अण्णा शिर्सेकर यांचाही वाढदिवसा निमित्ताने शाल श्रीफळाने अभिष्टचिंतन करण्यात आले व्यासपीठावर उपाध्यक्ष बजरंग चव्हाण सुनिल बोरकर सेक्रेटरी शिवाजी काळे मिलिंद तांबडे साई निकम जी डी आंबेकर प्रतिष्ठान कॅटरिंग कॉलेजचे प्राचार्य श्री सारंग आदी उपस्थित होते
(काशिनाथ माटल-प्रसिध्दी प्रमुख)
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra