स्वस्त दरात दीपावली साहित्य



राष्ट्रवादी काँग्रेस भायखळा विधानसभा नेते श्री प्रवीण खामकर यांच्या नेतृत्वाखाली सालाबाद प्रमाणे याही वर्षी घोडपदेव परिसरात स्वस्त दरात दीपावली साहित्य विक्री केंद्राचे उदघाटन मुंबई शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा सौ राखी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी मुंबई प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते श्री बबन कनावजे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते भायखळा विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते

श्री प्रवीण खामकर माझगांव तालुका युवक अध्यक्ष असताना सुरू झालेले हे कार्य आजही तेवढेच जोमाने सुरू आहे  सध्याच्या महागाई मुळे त्रस्त झालेल्या 

 स्थानिक नागरिकांना या विक्री केंद्रामुळे दिलासा मिळत आहे त्यामुळे लोकांचे आशीर्वाद श्री खामकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना लाभत आहेत.


घोडपदेव समूहाच्या वतीने त्यांच्या विधायक कार्याचा नेहमीच गौरव करीत आलो आहोत त्यांना उद्घाटन प्रसंगी आम्ही उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या

सर्व नागरिकांनी या विक्री केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन करीत आहोत


धन्यवाद

रिपोर्टर

  • Live Maharashtra
    Live Maharashtra

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Live Maharashtra

संबंधित पोस्ट