Breaking News
नवी मुंबई : नागरिकांचे हित लक्षात घेऊन त्यांची होत असलेली गैरसोय टाळण्याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्यापासून मेट्रो (Navi Mumbai Metro) सुरू करण्याचे आदेश सिडकोला (CIDCO) दिले आहेत. बेलापूर ते पेंधर या मार्गावर मेट्रो धावणार आहे. औपचोरिकरित्या लोकार्पण सोहळा न करता मेट्रो प्रवासी सेवेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे नवी मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
या मेट्रो मार्गावर 11 रेल्वे स्थानके असून विशेषत: खारघर आणि तळोजा मधील नागरिकांना याचा फायदा होणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून मेट्रो रेल्वे उद्घाटनाच्या प्रतिक्षेत होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळत नसल्याने अखेर मेट्रो सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी सिडकोला दिले आहेत.
पहिली आणि शेवटची मेट्रो कधी धावणार?
तळोजा-पेंधर वरून सुटणारी मेट्रो बेलापूर रेल्वे स्थानकापर्यंत धावणार आहे. मेट्रोने येणाऱ्या प्रवाशांना बेलापूर रेल्वे स्थानकात उतरून हार्बर मार्गे मुंबई ठाणे येथे जाणे सोईस्कर होणार आहे. उद्या, शुक्रवार 17 नोव्हेंबरपासून दुपारी 3 वाजता मेट्रो सुरू होणार आहे. रात्री 10 वाजता शेवटची फेरी असणार.
तर शनिवारी 18 नोव्हेंबरपासून सकाळी 6 वाजता पहिली मेट्रो धावणार आहे. दोन्ही बाजूंकडून मेट्रोची शेवटची फेरी ही रात्री 10 वाजता असणार आहे. मेट्रो 10 मिनिटांच्या अंतराने धावणार आहे.
मेट्रोच्या तिकीटाचे दर किती?
शून्य ते दोन किमीच्या टप्प्याकरिता 10 रुपये तिकीट दर आहे. 2 ते 4 किमीकरिता 15 रुपये 4 ते 6 किमीकरिता 20 रुपये 6 ते 8 किमीकरिता 25 रुपये 8 ते 10 किमीकरिता 30 रुपये आणि 10 किमीपुढील अंतराकरिता 40 रुपये तिकीट दर आहेत.
कोणत्या स्थानकांचा समावेश?
नवी मुंबईच्या या मेट्रो 1 मार्गिकेमध्ये 11 स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सीबीडी-बेलापूर सेक्टर 7 सिडको सायन्स पार्क उत्सव चौक खारघर सेक्टर 11 खारघर, सेक्टर 14 खारघर सेंट्रल पार्क पेठपाडा खारघर सेक्टर 34 पाचनंद आणि पेंधर-तळोजा अशी स्थानके आहेत. यामुळे नवी मुंबईकरांच्या प्रवासाची चिंता आता मिटणार असल्याचं सांगण्यात येतय. मेट्रोची ही मार्गिका संपूर्ण नवी मुंबईच्या अंतर्गत भागातून जाते. त्यामुळे या मार्गाचा खारघर नोडसह कळंबोली, रोडपाली आणि तळोजा परिसराला मोठा फायदा होणार आहे.
नवी मुंबई मेट्रोची वैशिष्ट्ये काय?
अत्याधुनिक रचनेचे वातानुकूलित डबे मेट्रो स्थानकांच्या दोन्ही (उत्तर व दक्षिण) बाजूने आगमन (एन्ट्री) आणि निर्गमनाची (एक्झिट) व्यवस्था आहे. मेट्रो स्थानकांवर पार्किंगसाठी जागादिव्यांग प्रवाशांकरिता रॅम्प पदपथ (फुटपाथ) ऑटो रिक्षांकरिता जागा अखंड वीज पुरवठ्यासाठी यूपीएससह डिझेल जनरेटरची (डीजी) व्यवस्था कॉनकोर्स आणि फलाटांवर प्रवासी घोषणा प्रणाली सीसीटीव्ही दिव्यांग व्यक्तींसाठी कॉनकोर्स स्तरावर विशेष स्वच्छता गृहांची व्यवस्था कॉनकोर्स परिसरात व्यावसायिक वापराच्या दृष्टीने दुकानांकरिता जागा ही नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra