Breaking News
दीपावली हा प्रकाशाचा उत्सव.आपली संस्कृती ही प्रकाशपूजक. काळोखाला चिरत प्रकाशाकडे जाणे हा आपल्या संस्कृतीचा मंत्र. या दीपावली कालावधीत लक्ष्मी पूजन दिनी दुसऱ्यांदा 200 बालिकांचे पाय धुत त्या चरणकमलावर गंध अक्षता कुंकुमतीलक लावीत अभिनव संकल्पना राबवित बालिकांचे पूजन केल्याने तो परिसर तो विभाग पवित्र करण्याचे कार्य श्री विजयबुवा कुलकर्णी करीत आहेत हेच खऱ्या अर्थाने
लक्ष्मी पूजन... असे उदगार मुंबई भाजप अध्यक्ष श्री आशिष शेलार यांनी काढले
कन्येला महत्व, सन्मान दिल्याने मनाला प्रसन्नता लाभते.
बालकांमध्ये नवदुर्गा होत्या. कोणी कुमारी तर कोणी त्रिमूर्ती, कल्याणी रोहिणी कालिका चंडिका शांभवी, दुर्गा, सुभद्रा अशी अनेक रूपे दिसून आली. हा चैतन्याचा सोहळा अनुभवण्यासाठी
अवघा जनसमुदाय लोटला होता.
कधी ना पाहिलेला कुतूहलाचा विषय म्हणून महिला वर्गाची गर्दी दिसून आली. विजय कुलकर्णी यांनी ही संकल्पना राबविताना समाजाला सुख लाभावे समृध्दी लाभावी त्यांच्या घरी भरभराट व्हावी. सुख ही तृप्तीची भावना. तृप्तीची भावना जितकी पवित्र तितकं त्याचे सुखाचे ऐश्वर्य मोठं. वेलीवरच्या फुलणाऱ्या कळ्याना लोभस देवत्वाचा मान देत विजय कुलकर्णी यांचे भक्तीचे अलौकिक दर्शन याचा उल्लेख करताना क्रिकेट पटू श्री प्रशांत जंगम यांच्या मातोश्री यांनी काढत श्री कुलकर्णी यांना शुभार्शीवाद देत
थोडीशी सुगंधित शब्द फुलांची उधळण अगदी आपुलकीने केली. शायरी करीत श्री रवि कांबळे यांनी कुलकर्णी बुवांचे केलेले कौतुक टाळ्यांची गडगडाट करून गेले.
विशेष म्हणजे बालिका पूजन सोबत विविध क्षेत्रात निस्वार्थ सेवा देत कर्तव्य बजावणाऱ्या विभागातील महिलांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. डॉक्टर, प्राध्यापक, वकील आणि परिचारिका वर्गातील महिला उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाला भाजपचे
श्री शरद चिंतनकर, नितीन बनकर, श्री रोहिदास लोखंडे, सेना युवानेते
निखिल जाधव, दिलीप वागस्कर, श्री संदेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम स्थळी विविध खाद्यपदार्थ स्टॉल, मुलांची खेळणी दिसून आली.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री सचिन श्रीधर यांच्या सुमधुर अष्टपैलू शैलीतून झाल्याने कार्यक्रमाची शोभा वृध्दिंगत झाली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra