घोडपदेव समूहाच्या कपडे वाटप कार्यक्रमाला अलोट गर्दी


घोडपदेव समूहाच्या सहकार्याने आणि समाजसेवक श्री दिलीप वागस्कर यांच्या सौजन्याने घोडपदेव डी पी वाडी श्री कापरेश्वर मंदिर प्रांगणात वय वर्षे 4 ते 10 वयांच्या मुला मुलींना मोफत कपडे वाटप कार्यक्रम पार पडला. ततप्रसंगी शिवसेना युवा नेते श्री निखिल यशवंत जाधव भाजप भायखळा विधानसभा अध्यक्ष श्री नितीन बनकर,उद्योगपती श्री मेहुलशेठ

 श्रध्दा वाघमारे, स्मिता साळवी, संगीता मारणे, सुनील डोंगरे, शिवाजी भिलारे, महेशदादा थोरात, माणिक निगडे, श्री राजा म्हात्रे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

श्री अरुणकुमार वर्पे यांनी प्रास्ताविक केले. श्री जगदीश नलावडे यांनी सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमाला समूहाच्या वतीने

श्री विलास गुढेकर, श्री विजय लांडे, श्री नागेश नांदोस्कर, श्री सचिन पप्पी शिंदे, श्री राजू तावडे, दत्ता गाढवे, दिनेश शेटे, अजय खांडगे, पांडुरंग गहिने,रुपेश गांगण, शुभम वागस्कर, मनोज शिवले, तुकाराम मारणे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. तर या कार्यक्रमाच्या दरम्यान कांच बिल्डिंग, बाबु गेणु नगर परिसरातील लहान मुलांनी समाजसेवक श्री दिलीप वागस्कर यांच्या कार्याचा गौरव म्हणून छोटेखानी सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास श्री किशोर वायकर, सुनील जाधव, सत्यवान सोनवणे,दिलीप लोध, मोहन राणे, सतीश करावडे,राजेश आईर आदी मान्यवरांनी मोलाचे सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी पार पाडला.

अखेर श्री ओंकार पवार यांनी सर्व उपस्थितांचे आणि घोडपदेव समूहावर प्रेम करणाऱ्या सर्व हितचिंतकांचे जाहीर आभार प्रकट करून कार्यक्रमाची सांगता केली.

रिपोर्टर

  • Live Maharashtra
    Live Maharashtra

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Live Maharashtra

संबंधित पोस्ट