Breaking News
घोडपदेव म्हाडा संकुल 3 k येथे लागलेल्या आगीत बहुतेकांचे नुकसान झालेच आहे. सौ सविता करावडे, पार्वतीबाई तांबोळी, श्रीमती मोरे आदी एकूण 12 रहिवाश्यांना धुराचा त्रास झाल्याने उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले होते. शिवाय विद्युत पुरवठा खंडित झाल्याने वयोवृध्द यांना त्रास होणार आहे. त्याही परिस्थितीत बेस्ट प्रशासनाने लिफ्ट सुरू केल्याने दिलासा मिळाला आहे.
परंतु ही आग सबंधित सर्व यंत्रणा कार्यान्वित करायला श्री नितीन बनकर साहेब, महेश भिंगार्डे, गौरव कासले नंदेश नाईक आणि त्यांचे सहकारी, आदी अनेक मान्यवर आहेत त्यांची नांवे ठाऊक नाहीत पण मोलाची मदत करताना दिसत होते. तेथील परिस्थिती पाहून नाष्टा टेबल लावण्यात आले होते. विशेष म्हणजे मुस्लिम समुदाय देखील आपल्या परीने मदत करीत होता.
भायखळा पोलीस ठाणे सर्वच बंधू भगिनी आपल्या घरचीच माणसं समजून शर्थीचे प्रयत्न करीत होती. एक मुस्लिम स्त्री डॉक्टर त्यांचे नांव ठाऊक नाही. परंतु ती धूर असताना देखील इमारतीत प्रत्येक घरात जाऊन तिने लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तपासणी केली. तिने स्वेच्छेने केले.तिला कोणी बोलाविले नव्हते. पण माणुसकीच्या दृष्टिकोनातून ती देवदूत म्हणून आली होती. तेथे मदतीला आलेला प्रत्येकजण देवदूतच होता. अग्निशामक दलाचे जवान असोत वा आरोग्यसेविका. डॉक्टर, परिचारिका अथवा समाजसेवी संस्था या देखील देवदूत होत्या.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra