वेतोबा देवाचे मंदिर पाहण्यासाठी अभ्युदय नगर मधील मनसेच्या भव्य कोकण महोत्सव व मालवणी जत्रोत्सवाला मोठी गर्दी..


पेंडुर येथील वेतोबा देवाच्या मंदिराची प्रतिकृती महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवडी विभाग आयोजित मालवणी जत्रोत्सवात रसिकांसाठी आकर्षण ठरत आहे. या कोकण महोत्सवाचे उद्घाटन माजी मंत्री बाळा नांदगावकर यांच्या हस्ते झाले शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 ते रविवार दिनांक 3 डिसेंबर 2023 पर्यंत चालणाऱ्या या मालवणी महोत्सवात खाद्य प्रेमींसाठी एक आगळी पर्वणी उपलब्ध झाली आहे.यात सागुती वडे, पापलेट,कोळंबी,मटण भाकरी असे अनेक पदार्थ आपण स्वाद घेवू शकता.कोकणातील उत्पादित पदार्थाना वाव देण्यासाठी हा एक स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे.

या महोत्सवात मंगळागौर,लावणी,भजन सारखे सांस्कृतिक कार्यक्रम दररोज रसिक प्रेक्षकांसाठी सादर केले जात आहेत.

राजेश मोरे आणि सविता जाधव हे आयोजनाची जबाबदारी सांभाळत आहेत.मनसेचे सर्व आजी माजी पदाधिकारी यांचं मोलाचं सहकार्य या महोत्सवासाठी लाभत आहे.

रिपोर्टर

  • Live Maharashtra
    Live Maharashtra

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Live Maharashtra

संबंधित पोस्ट