Breaking News
हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठान च्या वतीने प्राणज्योत यात्रा घोडपदेव मध्ये आल्यानंतर तिचे वाजतगाजत स्वागत करून चासकर चाळ येथे आणली गेली. या ठिकाणी हुतात्मा बाबू गेनू यांचे घर होते. त्या ठिकाणी दरवर्षी प्राणज्योत यात्रा आणून तिचे पूजन केले जाते. नंतर श्री कापरेश्वर मंदिराच्या आवारात जमलेल्या जनसमुदायासमोर बोलताना हुतात्मा बाबू गेनू च्या पावनभूमित राहतोय म्हणून आम्ही भाग्यवंत असे प्रतिपादन मनसे नेते श्री संजय नाईक यांनी केले. तर हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठान च्या वतीने अध्यक्ष श्री बाबाजी चासकर यांनी चासकरचाळ पूनर्विकास प्रकल्पात हुतात्मा बाबू गेनू यांचे स्मारक व्हावे, जेणेकरून या ठिकाणी दरवर्षी प्राणज्योतीचे पूजन करता येईल यासाठी विकासकाकडे एक राखीव घर हुतात्मा बाबू गेनू यांच्या नांवे द्यावे यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न व्हावेत अशी मागणी केली. त्यावर विजय बुवा कुलकर्णी यांनी विभागीय स्तरावर नक्कीच प्रयत्न करू.... असे आश्वासन दिले.
या प्रसंगी भायखळा कारागृह अधीक्षक श्रीमती संतोषी कोलेकर, लेखक श्री वसंत भालेराव, माणिक निगडे यांची भाषणे झाली. समाजसेवक श्री दिलीप वागस्कर, जालंदर भगत, दत्ता औटी, किशोर वायकर जनार्दन कोंडे आदि मान्यवर उपस्थित होते. तर शुभम भोर आणि दत्ता आवटे यांनी विशेष मेहनत घेतली. तर चासकर चाळीच्या वतीने महेशदादा थोरात यांनी आभार प्रदर्शन केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra