Breaking News
कौशल्य विभागामार्फत विविध प्रकारचे कोर्सेस उपलब्ध करून देण्यात येत असतात. पारंपारिक शिक्षण मुलांना आर्थिकदृष्ट्या रोजगारक्षम उपयुक्त ठरेलच असे नाही. मात्र कौशल्य प्रशिक्षण हे मुलांना खात्रीशीर रोजगार उपलब्ध करून देत असते. ही बाब लक्षात घेऊन शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई दक्षिण विभागाच्या वतीने मंगळवार दिनांक 05 डिसेंबर 2023 रोजी अहिल्या विद्या मंदिर काळाचौकी या शाळेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना "करिअर मार्गदर्शन" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उध्दघाटन श्री डॉक्टर प्रागजी वाझा यांच्या हस्ते करण्यात आले, प्रमुख मार्गदर्शिका श्रीमती स्मिता शिरपूरकर (शिक्षक समुपदेशक एच.के गिडवाणी हायस्कूल व जुनियर कॉलेज मुलुंड) तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्या विद्या मंदिर काळाचौकीचे मुख्याध्यापक श्री देवेंद्र आत्माराम मोरस्कर उपस्थित होते. सदर कार्यक्रम सकाळी दहा वाजता सुरू होऊन दुपारी एक वाजता संपन्न झाला या कार्यक्रमास विद्यार्थी व पालकांची लक्षणीय उपस्थिती होती.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra