Breaking News
मुंबई दि.३: केंद्र सरकारने कामगार हिता विरूद्ध संमत केलेल्या चार कोड बिला विरूद्ध लढा तीव्र करावा लागेल,असा इशारा,इंटक प्रणित,भारतीय राष्ट्रीय कर्मचारी आणि व्यावसायिक कामगार फेडरे शनचे उपाध्यक्ष,महाराष्ट्र इंटकचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी येथे "राष्ट्रीय सेमिनार" मध्ये बोलतांना दिला. प्रारंभी महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष डॉ.कैलास कदम यांनी या राष्ट्रीय सेमिनारचे उद्घाटन केले.
इंटक प्रणित भारतीय राष्ट्रीय कर्मचारी आणि व्यावसायिक कमगार फेडरेशनचे राष्ट्रीय स्तरावरील एक सेमिनार आज राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या मनोहर फाळके सभागृहात पार पडले.केंद्र सरकारने फोर कोड बिल संमत करून कामगारांचे हित आणि संघटनेचे स्वातंत्र्य धोक्यात आणले आहे.त्या विरूध्द देशभरातील सर्व इंटक प्रणित कामगार संघटनांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी हे सेमिनार आयोजित करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी फेडरेशनचे अध्यक्ष डॉ.एम.पी.पद्मनाभम होते .
महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ, राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र इंटकच्या वतीने या "राष्ट्रीय सेमिनार"चे यजमानपद सांभाळले होते.
केंद्र सरकारने स्वीकारलेल्या कामगार विरोधी धोरणा विरूद्ध जो लढा उभा रहात आहे, त्याला संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनी मोठेच बळ प्राप्त करुन दिले आहे,असे सांगून गोविंदराव मोहिते म्हणाले,केंद्राच्या कामगार विरोधी नीती विरूद्ध इंटकसह सर्व केंद्रीय कामगार संघटनांनी आज एकत्र येऊन लढा उभा केला आहे, त्या मागे देशातील कामगार वर्गाने ताकद उभी केली पाहिजे.
महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष डॉ.कैलास कदम म्हणाले,आताच लढा यशस्वी केला नाही तर कामगारांना भविष्यात मिळणारे सर्व हक्क आणि अधिकार दुरापास्त होतील! या विरुद्ध महाराष्ट्र इंटकच्या वतीने राज्यभर जागृती अभियान सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतीय राष्ट्रीय कर्मचारी आणि व्यावसायिक कामगार फेडरेशनचे सेक्रेटरी आणि आंबेकर श्रम संशोधन संस्थेचे संचालक जी.बी. गावडे यांनी या राष्ट्रीय सेमिनारच्या आयोजनात महत्त्वाचा हिस्सा उचलला होता.
आजच्या राष्ट्रीय सेमिनारला गुजरात,आंध्रप्रदेश,पश्चिम बंगाल, कर्नाटक,पॅंडेचरी,राजस्थान,मध्यप्रदेश,गोवा,मणिपूर आदी राज्यांतून प्रतिनिधी उपस्थित होते.केंद्र सरकारने स्वीकारलेली कंत्राटी पध्दती,सामाजिक सूरक्षितते बाबत दुर्लक्षित धोरण, असंघटित कामगारांना संघटित करणे आदी प्रश्नांवर राष्ट्रीय सेमिनार मध्ये सविस्तर चर्चा झाली.देशभरातून आलेल्या इंटक प्रतिनिधींनी केंद्र सरकारच्या धोरणातून कामगारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत,त्यावर सडकून टीका केली.राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी सामाजिक सूरक्षिततेवर आपले विचार मांडले.
फेडरेशनचे सरचिटणीस नैशाद देसाई यांनी उपस्थितांचे आभार मानले.इंटक अंध्यक्ष डॉ.सजीवा रेड्डी यांनी या राष्ट्रीय सेमिनारला शुभसंदेश पाठवून प्रतिनिधींच्या लढ्याचा आत्मविश्वास वाढविला.•••
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra