पाबळ गावच्या ग्रामपंचायत उपसरपंच पदी सुभद्राताई संजयराव बगाटे यांची बिनविरोध निवड

पाबळ गावच्या ग्रामपंचायत उपसरपंच पदी सुभद्राताई संजयराव बगाटे यांची बिनविरोध निवड पाबळ ता.शिरुर ग्रामपंचायत उपसरपंच सौ.सपनाताई अनिलराव जाधव यांनी राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी निवडणुक घेण्यात आली त्यावेळी सरपंच सचिनशेठ वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली १७ सदस्य असलेल्या पाबळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सुभद्राताई संजयराव बगाटे यांचा अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी आशीष भागवत यांनी सुभद्राताई संजयराव बगाटे यांची बिनविरोध निवड केली.राजकरणात येणारी भविष्यातील तरुण पिढी सुशिक्षित व सक्षम असणे तितकेच महत्त्वाचे आहे तेच ध्येय धोरण डोळ्यासमोर ठेवून पाबळ तालुका शिरुर जिल्हा पुणे या ठिकाणी सौ. सुभद्रा ताई संजय बगाटे यांची पाबळ ग्रामपंचायत उपसरपंच पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली त्यावेळी सचिन शिवाजी वाबळे सरपंच. सदस्य.सोपानशेठ लक्ष्मणराव जाधव माजी सरपंच.मारुतीशेठ ज्ञानेश्वर शेळके माजी सरपंच पाबळ.संजय नामदेव बगाटे.किरण हौसीराम गावडे उपसरपंच पुर.निलेश संजय बगाटे.सौ.सुजताताई तुषार जाधव.सौ.पुजाताई विशाल मनकर.सौ.कल्याणीताई मुकेश कामठे . सुप्रित अंकुश दगडे त्याच प्रमाणे समस्त ग्रामस्थ पाबळ ग्रामपंचायत पाबळ सरपंच उपसरपंच सदस्य मोठ्या संख्येने उपसरपंच पदाच्या निवडीसाठी उपस्थित होते.

रिपोर्टर

  • Kaluram Ghodake
    Kaluram Ghodake

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Kaluram Ghodake

संबंधित पोस्ट