Breaking News
शेतकऱ्याच्या मालकी जमिनीतून रस्ता केला पण शासनाने मोबदला नाही दिला - पुणे वरुडे गावाचे अल्पभूधारक शेतकरी अमिनभाई गुलाबभाई इनामदार यांची व्यथा
वरुडे गावाचे अल्पभूधारक शेतकरी अमिनभाई गुलाबभाई इनामदार यांच्या वडिलोपार्जित जमीन गट नंबर ११७२ मधून रेटवडी,वाकळवाडी,वरुडे ह्या रस्त्याचे काम सुरू आहे त्यांनी रस्त्याला कोणत्याही प्रकारचा विरोध केला नाही पण त्यांच्या मालकीहक्क असणाऱ्या जमिनीतून रास्ता शासन करत आहे परंतु त्यांना कोणताही मोबदला किंवा तसा पत्रव्यवहार देखील शासनाच्या मार्फत न करता रस्ता करत असल्याने शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान होत असल्याचे दिसत आहे.शासनाने त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सरकार कडे केली आहे.सदर जमीन शासनाने भूसंपादन कायद्यानुसार संपादन करून आम्हाला योग्य तो मोबदला शासनाने द्यावा अशी मागणी सदर इनामदार कुटूंबाने केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Kaluram Ghodake