कार्यसम्राट आमदार प्रकाश आबिटकर यांचा पाणीदार मतदारसंघ,वाकिघोलात हरित क्रांती

दुबळेवाडी व हळ्याचीवाडी (वाकीघोल), ता.राधानगरी येथे 2 कोटी 51 लाख रुपये खर्चुन बांधण्यात आलेल्या कोल्हापूर पध्दतीच्या व व्दारयुक्त बंधाऱ्यातून आडलेल्या पाण्याचा पाणी पुजन सोहळा मा.आमदार प्रकाश आबिटकर व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. राधानगरी तालुक्यातील दुबळेवाडी येथे कोल्हापूर पध्दतीचा बंधारा 49 लाख 85 हजार,व्दारयुक्त बंधारा दुबळेवाडी (1) 37 लाख 61 हजार,व्दारयुक्त बंधारा दुबळेवाडी (2) 31 लाख 80 हजार,व्दारयुक्त बंधारा दुबळेवाडी (3) 41 लाख 99 हजार,हळ्याचीवाडी कोल्हापूर पध्दतीचा बंधारा 84 लाख आदी कामांचा समावेश आहे. यावेळी राज्य आत्मा समितीचे सदस्य अशोकराव फराकटे,तुकाराम केसरकर (मामा),दत्तात्रय ढोकरे,बंडोपंत दळवी,ज्ञानदेव पाटील,मारुती तोरस्कर,दिनकर केसरकर,जोतीराम बाणे,रामराव बाणे,आडोली सरपंच कमल सुतार,उपसरपंच राजू ढोकरे,सावर्दे सरपंच तुकाराम यादव,उपसरपंच बाळासाहेब धोंड, चाफोडी उपसरपंच सागर पाटील,तानाजी ढोकरे,दिपक नाईक,गणपती तातवडे,भाऊ पाटील,विठ्ठल चव्हाण, बबन ढोकरे,केरबा ढोकरे,चंद्रकांत कांबळे,दयानंद पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

रिपोर्टर

  • Anil Rajivale
    Anil Rajivale

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Anil Rajivale

संबंधित पोस्ट