लोणार तालुक्यामधील मातमळ/ पिपळखुटा येथे सुरू असलेल्या जल जीवन मिशनचे काम निष्कृष्ट निकृष्ट दर्जाचे

कारेगाव:प्रतिनिधी : भागवत चव्हाण लोणार तालुक्यामधिल गट ग्रा.म.मातमळ/पिंपळखुटा येथे सुरु आसल्या जल जिवन मिशनचे काम इस्टिमेट नुसार एकही काम सुरू नसून बोगस पद्धतीने काम सुरू आहे. तरी या कामाची तत्काळ कॉलिटी कंट्रोल कडून चौकशी करून संबंधित ठेकेदारवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावकरी आणि शिवगर्जना युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश शिंदे यांनी केली आहे.गट ग्रामपंचायत मातमळ/ पिंपळखुटा येथील जल जीवन योजने अंतर्गत जे काम चालू आहे ते काम निष्कृष्ट दर्जाचे झालेले असून इस्टिमेट प्रमाणे कोणतेही काम सुरू नाही. विहीर, पाईपलाईन ,पाण्याच्या टाकीचे काम आणि विहिरीचे बांधकाम हे रेतीच्या ऐवजी कच वापरण्यात आलेली आहे.तसेच पाईपलाईनचे सुद्धा खोदकाम हे ईस्टर्ननुसार झालेले नाही. पाईपलाईन मध्ये सुद्धा पाईप हे अत्यंत कमी के.जी.असलेले पाईप वापरण्यात आलेले आहेत .सदर टाकी ही अंगणवाडी शेजारी असून सदर टाकीचे बांधकाम हे अत्यंत बोगस पद्धतीने झालेल्या असून अंगणवाडीत शिकणाऱ्या लहान -लहान मुलांच्या जीवीत्वास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. व तसेच गावातील पूर्ण रस्ते खोदून टाकले आहेत पण गावामध्ये पाईप लाईन न करता जुन्या पाईपलाईनला पाईप जोडलेले आहेत. ग्रामीण पाणी पुरवठा अभियंता यांनी प्रत्यक्ष येऊन गट ग्रामपंचायत मातमळ/ पिंपळखुटा या ठिकाणी येऊन कामाची पाहणी करावी व तसेच संबंधित ठेकेदाराला बिल अदा करू नये बिल अदा केल्यास शिवगर्जना युवा प्रतिष्ठानच्या वतीने व गावकरी यांच्या वतीने तीव्र जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे.

रिपोर्टर

  • Bhagvat Chavan
    Bhagvat Chavan

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Bhagvat Chavan

संबंधित पोस्ट