अंजनी खुर्द महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मदत द्या-उध्दव नागरे

कारेगाव: प्रतिनिधी - भागवत चव्हाण लोणार तालुक्यामधिल अंजनी खुर्द महसुल मंडळातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी कृषिमंत्री यांना निवेदन देण्यात आले.अंजनी खुर्द महसूल मंडळ लोणार तालुका जिल्हा बुलढाणा या मंडळात खरीप हंगामात पाऊसाचा खंड पडल्यामुळे पाण्याअभावी पिक सुकून गेली व येलो मोझिक नावाचा रोग पडल्यामुळे पिके पिवळी पडून खराब झाली.या दोन्ही संकटांनी शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.राज्य शासनाने शेतकऱ्यांना 1 रुपये मध्ये पिक विमा हि योजना आणली त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी पिक विमा भरला.शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे शासनाने कंपनीला २५ टक्के सरसकट नुकसान भरपाई देण्याचे सांगितले.व त्याच बरोबर शासनाने सुद्धा २५ टक्के अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना देणार असल्याचे जाहीर केले होते.पण अद्याप या दोन्ही मदती शेतकऱ्यांना मिळाल्या नाही.त्यामुळे उध्दव नागरे यांनी मंत्रालय मुंबई या ठिकाणी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन अंजनी खुर्द महसूल मंडळ मधील शेतकऱ्यांची व्यथा मांडली व पिक नुकसान भरपाई चे आदेश कंपनीला द्यावी असी मागणी केली व शासनाकडून सुद्धा लवकर मदत मिळावी असे निवेदन दिले सोबत गणेश गीते,पंडित ढाकणे,प्रल्हाद तुपे उपस्थित होते.

रिपोर्टर

  • Bhagvat Chavan
    Bhagvat Chavan

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Bhagvat Chavan

संबंधित पोस्ट