वरळी स्मशानभूमीत शासकीय स्टॅम्प पेपरची होळी..वरळी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद पोलीस तपास सुरु

वरळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेली वरळी स्मशानभूमी या ठिकाणी लोकांची जास्त वर्दळ नसल्याने व सेक्युरिटी गार्ड तैनात असल्याने स्मशानभूमीत सहसा कोणी जात नाही याचाच फायदा घेत शासकीय ओळखपत्र घालून व सोबत पोलीस संरक्षक घेऊन काही अज्ञात व्यक्तींनी गेली १५ दिवस येथे मोठया टेम्पोतून गोण्या भरून कटिंग केलेले स्टॅम्प पेपर आणत आहेत व जाळत असल्याची माहिती स्थानिक उप शाखाप्रमुख दिपक सापळे यांना मिळताच त्यांनी संपादक अनिल पवार यांना कळवली असता अनिल पवार यांनी लगेच स्थानिक वरळी पोलिस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.रवींद्र काटकर व त्यांचे ऑर्डरली श्री. खवणेकर साहेब यांना कळवताच त्यांनी लगेच पोलिसांची गाडी घटना स्थळी पाठवली त्यामुळे हा सर्व प्रकार उघडा झाला.त्यानंतर त्याठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे मनोज मर्चंडे,मनसेचे पदाधिकारी व स्थानिक मोठ्याप्रमाणात जमा झाले स्टॅम्प पेपर नक्की कुणाचे? कोणत्या कार्यालयातून आणले? याचा सूत्रधार कोण? या मागे कोणते रॅकेट आहे काय याचा तपास वरळी पोलीस ठाणे करत असल्याची माहिती वरळी पोलिसांकडून मिळाली.

रिपोर्टर

  • Anil Rajivale
    Anil Rajivale

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Anil Rajivale

संबंधित पोस्ट