Breaking News
बिबी येथे सेवालाल चौकात असलेला सेवालाल महाराजांचा झेंडा अज्ञात इसामाने तोडून नेला त्याबाबत बंजारा समाजाच्या वतीने बिबी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
किनगाव जट्टू रोडवर सेवालाल चौक म्हणून पाटी लावलेली आहे त्याचबरोबर सेवालाल महाराजांचा एक झेंडा सुद्धा मागील पंधरा ते वीस वर्षापासून तिथे लोखंडी पाईप मध्ये उभारलेला होता दरम्यान 26 जानेवारीच्या रात्री अज्ञात इसामाने सदरील झेंडा तोडून नेल्याचे समाजातील काही व्यक्तींच्या लक्षात आले.
त्यानंतर बिबी सह परिसरातील बंजारा समाज बांधव सेवालाल चौक येथे जमा झाले.सदर झेंडा हा बंजारा समाजाचे श्रद्धास्थान आहे.१५ फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराजांची जयंती येत आहे जयंती येथे साजरी होऊ नये या हेतूने अज्ञात समाजकंटकाने मागासवर्गीय विमुक्त भटक्या समाजाचे दैवत श्री संत सेवालाल महाराज यांचा ध्वज (झेंडा) तोडून नेला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.सदर अज्ञात व्यक्तीवर कायदेशीर कारवाई व्हावी.याकरिता बंजारा समाज बांधवाकडून बिबी पोलीस स्टेशनला देण्यात तक्रार करण्यात आली.या तक्रारीची दखल घेऊन लगेच बिबी पोलीस स्टेशनचे पीएसआय गजानन बास्टेवाड यांनी ठाणेदार सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवालाल महाराज चौक येथे येऊन सदर घटनेचा पंचनामा केला व लवकरच दोषींवर कारवाई करण्यात येईल असे पोलीस स्टेशन कडून सांगण्यात आले.घटनास्थळाचा पंचनामा झाल्या नंतर बंजारा समाज बांधवाकडून त्या ठिकाणी सेवा ध्वजाची विधीवत पूजा करून उभारणा करण्यात आली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Pradeep Chavan