बांधकाम विभाग खेळत आहे वाहनधारकांच्या जीवाशी

कारेगांव:-लोणार तालुक्यामधिल कारेगांव येथील जो मुख्य रस्ता करण्यात आला आहे.त्या त्या रस्त्यावरील जालना महामार्गाला लागूनच असलेला पूल हा जुनाच असून त्यावर ठेकेदाराने थातुर मातुर डांबरीकरण करून रस्ता पूर्ण करण्याचे काम केले.हि बाब बांधकाम विभाग अधिकारी यांच्या लक्षात येत नसेल का? असा प्रश्न वाहनधारकांना पडलेला आहे. सदर रस्त्याला एक मोठा ओढा लागत आहे त्या ओढ्यामध्ये सुद्धा ठेकेदाराने नुसते पोंगे टाकलेले आहेत ते पुलाचे काम केलेले नाही.या रस्त्यावरील नदी वरील मोठा पूल आहे त्याचे काम सुद्धा आज पर्यंत अर्धवटच करण्यात आलेले आहे.त्या पुलाच्या दोन्ही साईटला कडा नसल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.त्या पुलावर जर अपघात झाला तर त्या अपघाताची जिम्मेदारी कोण घेणार असा मोठा प्रश्न गावकऱ्यांना पडलेला आहे.सदर बांधकामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी स्थानिक गावकरी करत आहेत.सदर कामाची विचारणा सार्वजनिक बांधकाम विभाग केली असता अधिकारी जबाबदारी घेण्याऐवजी एकमेकांच्या अंगावरून जबाबदारी झटकत आहेत परंतु याचा त्रास मात्र वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.

रिपोर्टर

  • Bhagvat Chavan
    Bhagvat Chavan

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Bhagvat Chavan

संबंधित पोस्ट