Breaking News
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव सरहद येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अच्युत डोईफोडे हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून रामकिसन बोडखे,विजय मुंढे,गोपीचंद उघडे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य वडगाव सरहद हे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामदास वाघ सर यांनी केले.या कार्यक्रमात विविध सामाजिक ऐतिहासिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमाचं आयोजन केले गेले.सांस्कृतिक कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक वर्ग तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक पाटील सर यांनी तर आभार प्रदर्शन गजानन इंगोले सर यांनी केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Ramkisan Bodakhe