नाशिक सीमेन्स विभाग सचिव अशोक घुगे याचा सत्कार करताना कंपनीचे सी.ई.ओ.सुनील माथूर

नाशिक -  सीमेन्स वर्कर्स युनियनच्या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने सर्वांना निष्ठेने,विश्वासाने आणि प्रगती कडे वाटचालीच्या शुभेच्छा देऊन  कामगार संघटनेत नव्या  संकल्पना घेऊनच सातत्याने पुढे जाण्याचा ध्यास घेत आपण प्रगती करून दाखवली आहे.आणि त्यामुळेच साठ वर्षानंतर देखील आपली संघटना तरुण आहे असे प्रतिपादन  युनियनचे सचिव गिरीश आष्टेकर यांनी केले. 

              कालिदास कला मंदिरात  सीमेन्स वर्कर्स युनियनच्या हीरक महोत्सव कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सीमेन्स कंपनीचे सीईओ सुनील माथूर,एच.आर.हेड, शिल्पा काबरा माहेश्वरी,  एन.टी.यू.आयचे जनरल सेक्रेटरी गौतम मोदी, युनियनचेअध्यक्ष महेश सावंत-पटेलआदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी आष्टेकर यांनी युनियनचा 60 वर्षाचा आढावा सादर करतांना म्हणाले की,भविष्यात वेतन करार  होतीलच पण आता पुढे जात असताना इंडस्ट्री 4.0 आणि डिजिटलायझेशन,मर्जर- डिमर्जरअशीअनेकआव्हाने आहेत.सर्वांच्या सहकार्याने, विश्वासाने आणि व्यवस्थापनाच्या सहकार्याने  यावरआपण मातकरु शकतो असा विश्वास व्यक्त केला. त्या माध्यमातूनच आपली प्रगती देखील साधत  तुमच्या सर्वांच्या साथीने आपण आता 75 व्या वर्षाकडे वाटचाल करणार आहोत असे सागितले.या प्रसंगी कंपनीचे सीईओ माथुर यांनीसीमेन्स कंपनीचा ग्राहकसर्वप्रथम असून आपल्या क्षेत्रातील जागतिक पातळीवर वाढणारी स्पर्धा त्यासाठी असलेली तयारी आणि आपल्या सर्वांचे सामर्थ्य या त्रीसूत्रीवर काम केले तरच सीमेन्स जगभरातील कंपन्यांपेक्षा दोन पावलं पुढे राहील. कंपनीच्या 160 वर्षांच्या कालावधीत पिढ्यानपिढ्या हा वारसा सुरूआहे.ग्राहक आणि भविष्यातील स्पर्धेवर लक्ष ठेवले आणि सर्वांना सोबत घेतले तर कुणीही आपल्या प्रगतीला रोखू शकत नाही. इलेक्ट्रिकल आणिऑटोमेशन उत्पादन करणारीआपली एकमेव कंपनी आहे.त्या मुळेच जगातल्या सर्वोत्तम दहा डिजिटलाईज्ड कंपन्या मध्ये आपला समावेश होतो.हे टिकवण्यासाठीआपली विचार प्रणाली मात्र बदलावी लागेल.भारत व जगाच्या प्रगतीचा वेग बघता आपल्याला सर्वांच्या पुढे राहणे गरजेचेआहे.त्यात उशीर करून चालणार नाही. पंधरा ते वीस वर्षानंतर भारतीयअर्थव्यवस्था जगातल्या कोणत्याही अर्थव्यवस्थेपेक्षा झपाट्याने वाढणारी असेल. डीजिटलायझेशनचा वेग प्रचंड आहे.त्याचा अर्थ समजून घेत व्यक्तीश: स्वतःसाठी आणि नंतर कंपनीसाठीआपण काय फायदा करू शकतो याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.भविष्यात प्रगती करायची असेल तर सातत्याने या ज्ञानात भर टाकली पाहिजे.उत्पादनाची गुणवत्ता किंमत आणि विश्वासार्हता जेथे असेल तेथे ग्राहक जातो हे समजून घेतले पाहिजे.विश्वभरातील कंपनी भारतात येऊ इच्छितात.त्यांच्या स्पर्धेला तोंड द्यायचे आहे म्हणूनच ज्ञान वाढवणे गरजेचे आहे. नवे तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे.स्पर्धेसंबंधित प्रगती करायची असेल तर हे करावे लागेल आणि एकत्रितपणे हे आपण करू शकतो हे सर्वांना माहीत आहे.त्याच दिशेने सीमेन्स व्यवस्थापन व कामगार संघटना जात आहेतअसे मत या वेळी त्यांनी व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते युनियनच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. दरम्यान कळवा,नाशिक, गोवा.औरंगाबाद येथे हीरक  महोत्सव निमित्ताने झालेल्या विविध स्पधेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरव  करून समानचिन्ह प्रदान करण्यात आले.तसेच सातत्याने मॅरेथॉनधावणारे म्हणून नाशिक यूनियनचे विभाग सचिव अशोक घुगे, उपाध्यक्ष मनोज बोडके, याना व महाराष्ट्रात गिर्यारोहक रेसक्यू टिमचे कार्य करणारे नाशिक युनिट चे दयानंद कोळी याच्या  कार्याची विशेष दखल घेऊन  माथूर यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.तसेच संघटनेच्या माजी पदाधिकारी,हितचिंतक तसेच व्यवस्थापन प्रतिनिधी ह्यांचा संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला.सीमेन्स वर्कर्स युनियनची ६०वर्षाच्या वाटचालीची यशोगाथा  ही लघुनाटिका नाशिक येथील युनियनच्या सभासदांकडून सादर करण्यात आली. सुत्रसंचलन शिशिर ढवळे आणि हृषिकेश शिंदे ह्यांनी केले.आभार युनियनचे अध्यक्ष महेश सावंत-पटेल यांनी मानले.

रिपोर्टर

  • Yashavant Gosavi
    Yashavant Gosavi

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Yashavant Gosavi

संबंधित पोस्ट