सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून तरुण पडला पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला रेस्क्यू टिम कडून शोधकार्य सुरु

कोल्हापूर - काळम्मावाडी धरणाच्या पाण्याच्या प्रवाहातून उज्वल कमलेश गिरी( वय 21, रा.कोरोची माळ, ता. हातकणंगले, मूळ रा.बिहार) हा तरुण वाहून गेलाय. मित्रांसोबत फिरायला आला असताना सेल्फी काढताना पाय घसरून तो पाण्यात पडला. पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो वाहून गेला. मात्र,  अद्याप तो सापडलेला नसून रेस्क्यु टीमकडून त्याचा शोध सुरु आहे.


रिपोर्टर

  • Rupesh Adolikar
    Rupesh Adolikar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Rupesh Adolikar

संबंधित पोस्ट