माझा विजय निश्चिंत,मी एक्झिट पोलकडे पाहत नाही-:नारायणराव राणे

मागील पाच पन्नास वर्षे राजकारणात घालवली. आमचे पण काही अंदाज आहेत. आम्ही पण निवडणूक लढवली आहे. आम्ही निवडणूकीत नामधारी नाही तर सक्रिय होतो, त्यामुळे एक्झिट पोल कडे मी पाहत नाही,माझा विजय निश्चित आहे.

अशी स्पष्ट प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली. कुडाळ येथील गुलमोहर हाॅल येथे पदवीधर मतदारसंघ निवडणूकीची आढावा बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीनंतर ना.राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला होता.

मला उद्याच्या होणाऱ्या मतमोजणी आणि निकालाबाबत धाकधूक वाटत नाही. उत्सुकता कशाला मी विजयी होणार आहे. मला विजयाची १०० टक्के खात्री आहे. तर कार्यकत्यांनी रॅलीची तयारी केली असल्याचे ना.राणे यांनी सांगितले.


रिपोर्टर

  • Anil Rajivale
    Anil Rajivale

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Anil Rajivale

संबंधित पोस्ट