Breaking News
कारेगांव :-लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथील वार्ड क्र.१,२,६ मध्ये जाणून-बुजून राजकीय व्देष भावनेतून विकास कामे न करणाऱ्या व आलेल्या निधीचा गैरवापर करून बोगस काम करणाऱ्या सरपंचाला निलंबित करून गुन्हा दाखल करण्यात यावा. व मुजोर वैद्यकीय अधिकारी सोनी मॅडम यांची तत्काळ हकालपट्टी करण्यात यावी व आदी मागण्यासाठी. नागवंशी, संघपाल पनाड वंचित नेते व ईतर ग्रामपंचायत सदस्य यांच्या नेतृत्वामध्ये सुलतानपूर ग्रामपंचायत मधील भोंगळ कारभाराविरोधात सुलतानपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी मुंबई- नागपूर हायवे वरती डफडे वाजवून रस्ता रोको आंदोलन दि.१०/०६/ २०२४ रोज सोमवारला ठीक सकाळी १० वाजता करण्यात येणार असल्याचे सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Bhagvat Chavan