Breaking News
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ग्राहक असे अनेक वर्षापासून बिल देणे घेणे व्यवहार सुरळीतपणे चालू असताना केंद्र सरकारकडून खाजगीकरण करण्याचे काम सुरू असून तसे निर्देश दिल्याची भूमिका वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली आहे ग्रामीण भागामध्ये ग्राहक आपल्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्रात व पतसंस्थेमध्ये आपले बिल प्रामाणिकपणाने भरतो सरकारनं काही कंपन्या हाताशी धरून त्यांना ठेका देऊन प्रत्येक घरात नवीन स्मार्ट मीटर जोडून शेतकऱ्यांना संकटात टाकण्याचं काम सुरू केले आहे शिवसेना भुदरगड तालुक्याच्या वतीने केंद्र सरकारचा या निर्णयाविरोधात निषेध केला असून शिवसेनेने गारगोटी महावितरण ला निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे भविष्य काळामध्ये हुकूमशाही पद्धतीने शेतकऱ्यांच्या घरी प्रीपेड मीटर बसवण्याचे काम सुरू केलं तर ते शिवसैनिक हाणून पाडतील आणि यापुढे जाऊन हजारो शेतकऱ्यासह शेतकरी रस्त्यावर उतरतील असा इशारा शिवसेना भुदरगड तालुक्याच्या वतीने देण्यात आला यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी मार्गदर्शन केले तालुकाप्रमुख अविनाश शिंदे,कृष्णात डाकरे तालुका संघटक,बचाराम गुरव, थॉमस डीसोजा,अनिल देसाई,संदीप पाटील,तानाजी डेळेकर,सुनील गुरव,विनायक सावंत,अनिकेत भोई,सुभाष खटांगळे व शिवसैनिक उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Rupesh Adolikar