Breaking News
प्रतिनिधी..... अकोल्याचे सुप्रसिद्ध असे डॉ. सुजय पाटील यांनी मानसिक असो व्यसनाधीन असो अशा अनेक रुग्णांना जीवदान दिले आहे. डॉ. सुजय पाटील यांच्या प्रेमळ स्वभावामुळे अनेक रुग्णांना जगण्याची एक संधी मिळते. अकोल्यामधील प्रसिद्ध डॉ.असल्याने या दवाखान्यामध्ये फक्त तपासणी फी ५० रुपये ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे रुग्ण भरतीवेळी पासून ते सुट्टी होईपर्यंत फक्त रुग्णासाठी लागणारा औषधोपचार सहित सात ते आठ हजार रुपयापर्यंत या ठिकाणी बिल होते. कोणत्याही दवाखान्यांमध्ये फीस 500 रुपये आहे. 50 ते 60 हजारापर्यंत बिले होतात परंतु त्या मानाने हा दवाखाना गरिबांसाठी लाभलेले एक वरदान आहे. या दवाखान्याच वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गुरुवारी पेशंटला निशुल्क दरामध्ये जेवण दिले जाते. त्यामुळे अन्नदान सर्वश्रेष्ठ दान याचे महत्त्व आपल्याला कळते. दवाखान्यामधील संपूर्ण कर्मचारी सुद्धा रुग्णांची खूप काळजी घेतात. त्यामध्ये राहुल ताडम महत्त्वाची भूमिका बजावताना कामात व्यस्त असतात. रुग्णांची तसेच रुग्णासोबत आलेल्या नातेवाईकांची योग्य काळजी घेणारे "डॉ. सुजय पाटील" माणसातील एक देव माणूस आहे. हे म्हणण्यास वावगे ठरणार नाही.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Bhagvat Chavan