दिलीप भाकडे महाराज यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध ठिकाणी वृक्षारोपण, फळ वाटप......... साखरखेर्डा

प्रतिनिधी - साखरखर्डा येथून जवळच असलेल्या आमखेड गावात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. त्याचप्रमाणे साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये फळ वाटप केले असून या सर्व कार्यक्रमांनी दिलीप भाकडे महाराज यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रथम गावातील गजानन महाराज मंदिरामध्ये अभिषेक करून सुरुवात झाली. नंतर शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिलीप भाकडे महाराज यांनी माल्यार्पण  केले. त्याचप्रमाणे गावात विविध ठिकाणी वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला. दरवर्षी संत गजानन महाराज माऊली फाउंडेशन तर्फे विविध कार्यक्रम राबविले जातात या कार्यक्रमा वेळी अनिल भाकडे, अभिनय देशमुख, गोपाल मोरे, दीपक चिंचोलकर, संतोष खरात हे उपस्थित होते.

रिपोर्टर

  • Bhagvat Chavan
    Bhagvat Chavan

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Bhagvat Chavan

संबंधित पोस्ट