Breaking News
कारेगांव :- सिंदखेडराजा तालुक्यातील पांग्री उगले येथील नागरिकांनी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष विकास उगले यांच्या नेतृत्व पांग्री उगले येथील मुख्य रस्त्यावरल खड्ड्यामध्ये बेसरीमीचे झाड लाऊन आंदोलन करण्यात आले. पांग्री उगले या गावाच्या रस्त्याची दुर अवस्था फारच कठीण झालेली आहे. पांग्री उगले येथील नागरिकांनी वारंवार प्रशासनाला निवेदने देऊन सुद्धा प्रशासनाने हेतु परस्पर या गावातील रस्त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. सध्या पावसाचे दिवस सुरू झालेले आहे त्या रस्त्यावरती जाण्या - येण्यासाठी भरपूर असा त्रास नागरिकांना सहन करवा लागत आहे. रस्त्यावरती भले मोठे - मोठे खड्डे पडलेले असून खड्डे मध्ये पावसाचे पाणी सासू खड्ड्यांना तलावाचे स्वरूप निर्मान झालेले आहे . तरी प्रशासनाला कधी जाग येणार असे पांग्री उगले येथील नागरिक बोलत आहेत .आणि हा रस्ता जर लवकर - लवकर तयार नाही झाला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि गावातील नागरिक यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार आसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष विकास उगले आणि गावकऱ्यांनी दिला आहे.
https://www.youtube.com/c/LiveMaharashtraNewsEntertainment
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Bhagvat Chavan