Breaking News
मंठा / प्रतिनिधी
श्री क्षेत्र निळकंठेश्वर पिंपरखेडा पायी दिंडी सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी सहभागी होऊन श्री श्री 1008 स्वामी कृष्णचैतन्य पुरीजी महाराज मृदंग सेवक तुकाराम महाराज काकडे जयपूर श्री ह भ प रामचंद्र महाराज आंत्रज श्री ह भ प शंकर महाराज देवकर मेहकर श्री ह भ प कोकाटे महाराज श्री ह भ प ज्ञानेश्वर महाराज पांढुर्णा यांचे भव्य स्वागत केले.
या वेळी गणेशराव खवणे नाथाराव काकडे मनोज देशमुख कैलासराव बोराडे नागेश घारे विलास घोडके दत्ताराव खराबे सोपान वायाळ श्री राम जाधव मालदार विठ्ठल मामा काळे एन डी दवणे भगवान देशमुख शरद मोरे कैलास चव्हाण महादेव बाहेकर हरिभाऊ देशमुख बाबासाहेब देशमुख ज्ञानेश्वर देशमुख परमेश्वर शिंदे प्रकाश मोरे पवन केंधले माऊली गोंडगे संजय गायकवाड लक्ष्मण बोराडे महादेव हजारे सचिन राठोड जानकीराम चव्हाण नरेंद्र ताठे निवास देशमुख प्रेम राठोड यांची उपस्थिती होती.
आमदार लोणीकर यांनी वारकरी भाविक भक्तांच्या या दिंडीत सहभागी होऊन पाप ताप दैन्य जाय उठाउठीं । जालिया या भेटी हरीदासांची ॥१॥
ऐसें बळ नाहीं आणिकांचे अंगीं । तपें तिर्थे जगीं दान व्रत ॥ध्रु.॥
चरणींचे रज वंदी शूळपाणी । नाचती कीर्तनीं त्यांचे माथां ॥२॥
भव तरावया उत्तम हे नाव । भिजों नेंदी पाव हात कांहीं ॥३॥
तुका म्हणे मना जालें समाधान । देखिले चरण वैष्णवांचे ॥४॥
ह्या अभंगाचे गायन केले.
श्री निळकंठेश्वर भगवंताच्या आशीर्वादाने व गुरुवर्य वेदांताचार्य श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी आत्मचैतन्य पुरी महाराज यांच्या आशीर्वादाने श्री क्षेत्र निळकंठेश्वर संस्थान ते श्री शेत्र पंढरपूर पायी वारी सोहळ्यात सहभागी वारकरी भाविक भक्तांना अतिश कोंडीराम राठोड यांच्या पिंपरखेडा येथील आश्रम शाळेवर सकाळच्या फराळाचे वाटप करण्यात आली होते. तर दुपारचं अन्नदान श्री अनंत अभिमन्यू बोडखे यांच्या तळणी फाटावरील मळ्यात करण्यात आले होते. या पायी वारी दिंडी सोहळ्यात माळतोंडी ढोकसाळ वाढेगाव पांढुर्णा आर्डा पिंपरखेडा लावणी मेसखेडा वाघाडी गेवराई विडोळी आंध्ररुड वैद्य वडगाव आवलगाव देवठाणा कोकरंबा शिरपूर आधी पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळी उपस्थित होती.
श्री निळकंठेश्वर भगवंताच्या आशीर्वादाने व गुरुवर्य वेदांताचार्य श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी आत्मचैतन्य पुरी महाराज यांच्या आशीर्वादाने श्री क्षेत्र निळकंठेश्वर संस्थान ते श्री शेत्र पंढरपूर पायी वारी दिंडी आज महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या विशेष प्रयत्नातून शेगाव पंढरपूर दिंडी महामार्गावरून आज मंठा तालुक्यातील पहिली दिंडी पंढरपूर कडे रवाना झाली. या शेगाव पंढरपूर महामार्गाची लांबी परतुर विधानसभा मतदारसंघात 95 किलोमीटर असून मंठा तालुक्यातील सरहद वडगाव पासून तळणी फाटा वाटूर परतूर आष्टी हुन माजलगाव ला जातो.
महाराष्ट्र राज्यातील वारकरी भाविक भक्तांचे आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाकरिता भाविक भक्त वारकरी महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून आषाढी वारीला होत असलेल्या पायी दिंडीत सहभागी होत असतात. एक दिंडी शेगाव वरून पंढरपूरला जात असते या दिंडीत हजारो भाविक भक्त महिला मुले मुली सहभागी असतात. याच दिंडीला दहा वर्षांपूर्वी जालना जिल्ह्यातील अंबड जवळ दिंडीत ट्रक घुसल्याने मोठा अपघात झाला होता यात दहा ते बारा वारकरी भक्तांचा मृत्यू झाला होता. हा जालना जिल्ह्याला लागलेला सर्वात मोठा काळा डाग होता. म्हणून मी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री मा. ना. नितीनजी गडकरी यांच्या कडे सातत्याने पाठपुरावा करून शेगाव ते पंढरपूर दिंडी महामार्ग बांधण्यासाठी आग्रह धरल्यामुळे हा दिंडी महामार्ग मंजूर झाला त्याचा उद्घाटन सोहळा नऊ वर्षांपूर्वी वाटुर तालुका परतुर या ठिकाणी संपन्न झाला. या उदघाटन सोहळ्यास महाराष्ट्र राज्यातील हजारो साधू संत कीर्तनकार लाखो वारकरी उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Ramkisan Bodakhe