महाड येथील तलावाचा प्रश्र्न विधानसभेत मांडून तलावाचे शतकोउत्सव साजरा करणार

साखरखेर्डा- प्रतिनिधी  

आमदार संजय गायकवाड यांनी विधानसभेत महाड येथील चवदार तलावाचा प्रश्र्न मांडून शासनाचे लक्ष वेधले आहे.तलावाचे सुशोभीकरण करुन शतकोउत्सव साजरा करण्यात यावा अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली व शासनाने ती मान्य केली. 

महाड येथील चवदार तलावातील पाणी दलित समाजाला वापरण्यास काही उच्चवर्णीय लोकांनी बंदी घातली होती. गुरे,ढोरे या तलावातील पाणी पिऊन आपली तहान भागवू शकतात,परंतू दलित समाजाला तलावाजवळ जाण्यासही बंदी घालण्यात आली होती. समाज बांधवांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड तलाव मुक्तिसाठी आंदोलन केले. स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तलावातील पाणी प्राशन करून दलित समाजाला तलावातील पाणी वापरण्यास खुले करुन दिले. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे  तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही असे ठणकावून बाबासाहेबांनी सांगितले.२०२७ ला महाड येथील चवदार तलावाच्या आंदोलनाला १०० वर्ष पूर्ण होत आहेत त्या तलावाला एक राष्ट्रीय स्मारक म्हणून दर्जा देण्यात यावा व तलावाची दुरुस्ती करीता विशेष निधीची तरतुद करण्यात यावी आणि महाड येथील संत्याग्रहाचा शतकोउत्सव साजरा करण्यात यावा अशी मागणी बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांनी केली.त्यांच्या या मागणीची दखल शासनाने घेतली आहे. संजय गायकवाड यांनी तलावाचा प्रश्र्न मांडल्याबद्दल आज ३ जुलै रोजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य संदीप खिल्लारे,अनंता शेळके,गोपाल राजपूत,माजी सरपंच सुधाकर गवई,दादाराव गवई,माजी उपसरपंच दर्शन गवई यासह समाज बांधवांनी महायुतीचा जयघोष केला आणि आमदार संजय गायकवाड यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.

रिपोर्टर

  • Darshan Gavai
    Darshan Gavai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Darshan Gavai

संबंधित पोस्ट