Breaking News
महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना "घोषित केलेली आहे यामध्ये रुपये १५००/ महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही योजना याच महिन्यात चालू होणार आहे सदर योजना महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत राबवल्या जाणार आहे. ही लाडकी बहीण योजना राज्य सरकार च्या वतीने घोषित झाल्याने राज्यभरातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. खरोखरच आमच्या खेड्यापाड्यातील गोरगरीब कष्टकरी शेतमजूर शेतकरी महिलांना संसाराचा गाडा हाकताना नक्कीच मदत होणार आहे. या योजनेची तात्काळ अंमलबजावणी होण्याच्या उद्देशाने आपण महिलांकडून अर्ज भरून घेण्याची मुदत 15 जुलै पर्यंत ठेवली आहे. राज्यभरात अर्ज भरून घेण्याचे काम ही अतिशय वेगाने चालू आहे. परंतु महाराष्ट्र राज्यातील गावागावातून लाखो महिला पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाकरिता गावागावातून निघालेल्या दिंड्यामध्ये सहभागी झाल्या आहेत. त्या मुळे माझी लाडकी बहिणी योजनेची अर्ज करण्याची मुदत एक महिना वाढवून मिळावी. अशी मागणी करणारे पत्र आज महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी मुंबई येथे चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनात उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना भेटून दिले आहे. यावेळी लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Ramkisan Bodakhe