Breaking News
साखरखेर्डा ( अशोक इंगळे )
आज ४ जुलै रोजी शासनाने एका लक्षवेधी सूचनेवर रानडुक्कर मारण्याची परवानगी शेतकऱ्यांना दिली . तो प्राणी कोण मारणार हा मुद्दा महत्त्वाचा असून शेतकऱ्यांजवळ असे कोणतेही हत्यार नाही . ही जबाबदारी शासनाने घेऊन निलगाय हे प्रकरणही आता विधानसभेत कोण मांडणार याकडे विदर्भातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे .
बीड येथील आमदार संदीप शिरसागर यांनी विधानसभेत लक्षवेधी प्रश्र्न मांडतांना शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस या पिकात रानडुक्कर प्रचंड नुकसान करीत आहे . त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे . शेतात , पाडावर राहणाऱ्या शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत धरून राहावे लागत आहे . अनेकवेळा मजूरावर या प्राण्यांनी हल्ला देखील केला आहे . त्यावर शासनाने रानडुक्कर मारण्याची परवानगी आज दिली आहे . बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात सवडद , हनवतखेड , हिवरागडलिंग , गुंजमाथा , शेलगावकाकडे , शेवगा जाॅहागीर या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रानडुक्कर आहेत . या भागातील शेतकरी ऊस , मका ही पिके घेतात . या पिकाची नासाडी हा प्राणी करतो . सवडद येथील भवानी देशमुख यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना लेखी तक्रार देऊनही पंचनाम्या शिवाय काहीच केले नाही . दोन वर्षांपासून सतत तंक्रार , फोटो , रानडुक्कराचे फोटो दाखवून ही मदत मिळाली नाही .
सिंदखेडराजा तालुक्यात सोयाबीन हे महत्त्वाचे पिक असून जवळजवळ १०० टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत . शेत , रान हिरवेगार झाले आहे . कोवळ्या सोयाबीन पिकावर निलगाय ( रोही ) मनसोक्त ताव मारत आहेत . तेवढ्यावरच ते थांबत नाही तर एकामागोमाग एक शेतातून धावत असल्याने संपूर्ण शेती तुडविल्या जाते . उभी पिके मोडली जातात . एका एका कळपात ७५ ते ८० रोही असतात . शेतकरी हाकलायला जातो तर शेतकऱ्यांच्या अंगावर चाल करतात . त्यांना आता कोणतीही भिती वाटत नाही . कुत्रेही त्यांना पाहून दुम ठोकतात . तालुक्यातील सोनोशी , दुसरबीड , मलकापूर पांग्रा , शेंदुर्जन , साखरखेर्डा भागात एफ क्लासचे ४ हजारांपेक्षा जास्त क्षेत्रफळ आहे . या जंगलात हे प्राणी राहातं नाही . आता संपूर्ण क्षेत्रच त्यांनी व्यापून टाकले आहे . एका एका गाव क्षेत्रात दोन दोन कळप दिसत आहेत . पळताना एकामागोमाग एक पळत सुटले की त्यांना रस्ता दिसत नाही , रस्त्यांवरुन चालनारे वाहन दिसत नाही . त्यामुळे अनेक अपघात रोही या प्राण्यामुळे होतात . याची दखल बुलढाणा जिल्ह्यातील विशेष करून आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांनी घेऊन विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडावी . आणि ( निलगाय ) रोही या प्राण्याचा कायम बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे .
-------------------------------------------------------------
सिंदखेडराजा तालुक्यात निलगायीची संख्या प्रचंड वाढली असून या जंगली प्राण्याने उभ्या पिकात धुडगूस घातला आहे . आमदार संदीप शिरसागर यांनी जसा रानडुकरांचा बंदोबस्त शासनाकडून केला . तसाच बंदोबस्त आपल्या भागातील आमदारांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडून करावा .
बंद्रीभाऊ वाघ
माजी समाजकल्याण सभापती
जिल्हा परिषद बुलढाणा
-------------------------------------------------------------
या भागात रोही , माकड आणि रानडुक्कर या प्राण्यांची संख्या वाढली आहे . हे प्राणी माणसावर चाल करतात . याची दखल घेऊन शासनाने या प्राण्यांचा बंदोबस्त करावा .
भवानी देशमुख ,
ऊस उत्पादक शेतकरी
सवडद .
-----------------------------------------------------------
शेतकरी शेतात एकटा असेल तर रोही त्या शेतकऱ्यांवर हल्ला करतात . शेती कशी करावी हा प्रश्न उपस्थित होत आहे . मागिल वर्षी सुनील तिडके यांच्यामागे रोही लागला होता . त्यांनी आरडाओरड केल्याने परिसरात कुत्रे धावत राही यांच्यावर धावल्याने तिडके यांचे प्राण वाचले .
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Darshan Gavai