Breaking News
मंठा : येथील द्वारकाबाई नारायणराव बोराडे यांचे [ता.२६] शुक्रवार रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ८५ वर्षे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा व मुलगी, सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे. प्रल्हाद नारायणराव बोराडे यांच्या त्या आई होत. तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा नगरसेवक वैजनाथ बोराडे यांच्या त्या काकू होत्या. द्वारकाबाई बोराडे या धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या अंत्यविधीस सर्व क्षेत्रातील मान्यवर व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Ramkisan Bodakhe