कारेगाव येथील ग्रामसभा ठरवली निष्फळ,कामाचे मुद्दे सोडून ग्रामसभा तहकूब

कारेगाव:-लोणार तालुक्यातील कारेगाव येथे दिनांक १३/८/२०२४ रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून गावातील सरपंच सौ.नर्मदा विश्वनाथ केंदळे ह्या होत्या तर उपाध्यक्ष म्हणून तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजीराव गायकवाड हे होते.गावांमधील दारूबंदी करण्यात यावी,मुख्य रस्ता बांधकाम विभागाने लवकरात लवकर मार्गी लावण्याचे काम करण्यात यावे,कारेगाव हे लवकरात लवकर हागणदारीमुक्त करण्यांत यावे,गावातील ट्रान्सफॉर्मर हस्तांतरित करावा,गावामध्ये धूर फवारणी करणे,गावामध्ये मुरूम टाकणे , शाळेच्या गेटची उंची वाढवणे,शाळेतील पाण्याची टाकी दुरुस्त करणे,गावातील मोकळ्या जागेची ग्रामपंचायत मध्ये नोंद घेणे,ग्रामसेवक यांनी गावकऱ्यांना नवनवीन योजनेची माहिती देणे,वाचनालयासाठी प्रस्ताव पाठवणे,पेव्हर ब्लॉकचे बांधकाम करणे,ग्रामपंचायत भवन बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे,घंटागाडी बंद असलेली चालू करणे,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या गेटला जाळी लावणे ग्रामपंचायत शिपायाने दररोज ग्रामपंचायत कार्यालय उघडे ठेवणे,मुख्य रस्त्यावरती गाडी बैल वाहने उभे करू नये व गावांमध्ये हिंदू मशान भूमीचे काम चालू असून त्या शेडचे काम हे अंदाज पत्रकानुसार करण्यात यावे अशी सुद्धा मागणी गावकऱ्यांनी ग्रामसभेत केली. हे सर्व विषय ग्रामस्थांनी मांडताच ग्रामपंचायतचे सचिव खरात साहेब यांनी भर सभेमधून पालायन केल्याचे दिसले त्यामुळे गावकरी हे संतप्त झाले आणि ग्रामपंचायत समोर जाऊन धरणे देण्यास तयार झाले हा विषय विस्तार अधिकारी ठोके साहेब यांना दूरध्वनी द्वारे माहिती देण्यात आली व त्यानंतर गावातील प्रतिष्ठित व्यक्ती पांडुरंग केंधळे व शिवाजीराव गायकवाड यांनी सचिव यांच्याशी संपर्क करून त्यांना ग्रामपंचायत मध्ये बोलावले त्यानंतर ग्रामसेवक साहेबांनी या वरील मुद्द्याची ग्रामपंचायत मध्ये मीटिंग घेऊन आम्ही आमच्या स्तरावर कोणकोणते मुद्दे अमलात आणता येईल याची चर्चा करून उद्या दिनांक १४/८/२०२४ रोजी नोटीस बोर्ड वरती लावतो असे सांगितले.ही ग्रामसभा निवडणूक झाल्यापासून दुसरीच होती व तीही तहकुब झाली तरी वर्षांमध्ये चार ग्रामसभा घ्याव्या लागतात तर या ग्रामसेवक साहेबांनी वर्षातून दोनच का घेण्यात आल्या यावर सुद्धा गावकऱ्यांना प्रश्न निर्माण झाला आहे व ही ग्रामसभा तर तहकुब झाली.तरी ही ग्रामसभा ग्रामसेवक साहेब परत केव्हा घेणार आहे आसा प्रश्न गावकऱ्यां समोर आहे.या विषयाकडे वरिष्ठांनी विशेष लक्ष देण्यात यावे अशी मागणी सुद्धा गावकऱ्यांनी केली आहे.

रिपोर्टर

  • Bhagvat Chavan
    Bhagvat Chavan

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Bhagvat Chavan

संबंधित पोस्ट