Breaking News
कारेगाव- जालना ते नागपूर या महामार्गावर अंजनी खुंर्दे हे गाव असून या गावाच्या समोर राज्य महामार्गावर मोठी नदी आहे त्या नदीच्या पुलावरून आयशर क्रमांक एम एच 12 पी क्यू 4227 क्रमांकाचे आयशर पलटी झाला त्यामध्ये महिंद्रा कंपनीचे स्पेअर पार्ट आहेत या घटनेची माहिती सुलतानपूर येथील पोलीस चौकीला मिळताच तेथील कर्मचारी कटक साहेब आणि नागरे साहेब हे घटनास्थळी हजर झाले.आयशर ड्रायव्हर चे म्हणणे आहे की या राज्य महामार्गाच्या साईडच्या रस्त्याला मोठ -मोठे खड्डे पडलेले असल्यामुळे हे खड्डे चुकवण्याचा नादात गाडी ड्रायव्हर रॉंग साईडला गाडी चालवत आहेत तसेच या राज्य महामार्गावरील नदीवरील पुलाला दोन्ही साईडला कडा नसून दर्शन फलक सुद्धा राज्य महामार्गाने लावलेला नाही .त्यामुळे या ठिकाणी अनेक वेळेस अपघात घडलेले आहेत तरी या घटनेकडे राज्य महामार्गाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे व या नदीवरील पुलाला दोन्ही साईटला कडा टाकून दर्शन फलक लावण्याची मागणी वाहनधारक करत आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Bhagvat Chavan