७ वर्षीय कल्पेश खंडारे ह्याने मिळवले एमटीएस ऑलंपियाड शासनमान्य राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत रौप्य पदक

प्राथमिक शाळेपासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची माहिती व्हावी आवड निर्माण व्हावी याकरिता

एमटीएस ऑलंपियाड महाराष्ट्र शासन मान्य राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा चे आयोजन करण्यात येत असते,यासाठी बुलढाणा जिल्ह्यातून परीक्षा केंद्र हे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिंदी येथे असते सदर सर्व स्पर्धा परीक्षेला मार्गदर्शन सहाय्यक शिक्षक सोमनाथ लोमटे हे करत असतात,आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली एमटीएस ची परीक्षा सन २०२३ - २४ पार पडली होती ,जिल्हाभरातून अनेक विद्यार्थी यामध्ये सहभागी होते, स्पर्धा परीक्षेमध्ये ७ वर्षीय विद्यार्थी कल्पेश सचिन खंडारे हा सुद्धा सहभागी झाला होता .

विशेष म्हणजे पहिल्या वर्गात असल्यामुळे अक्षरांची ओळख सुद्धा त्याला झाली नव्हती परंतु घरी सराव करत लोमटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तो पहिल्या वर्गातून उत्तीर्ण झाला व त्याला १५ ऑगस्ट रोजी शालेय समितीचे अध्यक्ष गोपाल खरात,माजी सरपंच शिवसेना जेष्ठ नेते गंभीरराव खरात,सरपंच सौ साधना अशोक खरात,त्याचबरोबर तंटामुक्तीचे अध्यक्ष शेषराव बंगाळे सचिव दिनकर काळे,अशोक खरात,उपाध्यक्ष पंजाब मोरे यांच्या हस्ते सिल्वर मेडल प्रमाणपत्र शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले,१ वर्गामध्ये कल्पेश सचिन खंडारे सिल्वर मेडल,साई सोमनाथ लोमटे गोल्ड,वर्ग दुसरी मधून स्वरा अनिल येरमुले,चेतन शिवदास खरात सिल्वर, जुई ज्ञानेश्वर बंगाळे ब्राँझ, वर्ग ३ रीतून खुशी छगन चांदोरे गोल्ड,अविष्कार ज्ञानेश्वर भांड सिल्वर,धनश्री श्रीधर इंगळे ब्राँझ,आरव प्रदीप खरात ब्रांझ, फाल्गुषी संतोष साळवे ब्राँझ,हर्षल समाधान मोरे ब्राँझ,शिवदास गोपाल खरात,ब्रांझ,नम्रता रवी वाघमारे ब्राँझ, ४ वर्गामधुन यशोदीप सुनील कराळे गोल्ड,सुरज रवींद्र गवई सिल्वर,संस्कृती नितेश खरात सिल्वर, रोहित शरद खरात सिल्वर,ज्ञानेश्वर संदीप इंगळे ब्रांझ,ज्ञानेश्वरी अंकुश खरात ब्रांझ,तेजस्विनी कृष्णगिर गिरी ब्राँझ,प्रणव श्रीधर खरात ब्राँझ, ६ व्या वर्ग मधून ऋतिक पद्माकर खरात गोल्ड , प्रीती बळीराम गवई गोल्ड,विकी रमेश गवई सिल्वर,प्रीती गोपाल खरात गोल्ड,समीक्षा प्रदीप खरात सिल्वर,साक्षी विलास तोडे,ब्रांझ,सुजाता शिवदास खरात ब्रांझ , खुशी ज्ञानेश्वर बंगाळे ब्रांझ यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांना यावेळी पदक प्राप्त झाले आहे,कल्पेश यांना पहिल्या वर्गामध्ये रोजचे पदक मिळाल्यामुळे परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे .

रिपोर्टर

  • Darshan Gavai
    Darshan Gavai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Darshan Gavai

संबंधित पोस्ट