शासनाच्या योजनेमुळे विद्यार्थिनींमध्ये शिक्षणाची ओढ निर्माण होते - (पर्यवेक्षक व्ही. एम. ठाकूर)

साखरखेर्डा प्रतिनिधी

सिंदखेड राजा  पंचायत समिती (शिक्षण) विभाग अंतर्गत मानव विकास मिशन या योजने अंतर्गत दरवर्षी मुलींना सायकल वाटप केली जाते.वर्ग ८ ते १२ या विद्यार्थिनींना ही सायकल वाटप केली जाते.यावर्षीही ४७१ पैकी ३६६ सायकल प्रस्ताव मंजूर झाले होते.सर्व प्रवर्गातील विद्यार्थिनींना या सायकल वाटप केल्या जातात.गटशिक्षणाधिकारी भास्कर वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुख दिलीपराव खंडारे व गट साधन व्यक्ती प्रवीण भाऊ गवई यांनी या योजनेखालील सर्व विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ दिला.या शासनाच्या योजनेमुळे विद्यार्थिनींमध्ये शिक्षणाची ओढ निर्माण होऊन शिक्षणाची सोय व्हावी म्हणून हा लाभ दिला गेला पाहिजे असे  प्रतिपादन शाळेचे पर्यवेक्षक व्ही.एम.ठाकूर यांनी केले.यावेळी दर्शनकुमार गवई,समाधान पाझडे ,प्रताप पागोरे, सतीश पोंधे, प्रताप तघरे, सय्यद इम्रान, राजकुमार खताळ, सुमन सरकटे गौतम जाधव हे उपस्थित होते.

रिपोर्टर

  • Darshan Gavai
    Darshan Gavai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Darshan Gavai

संबंधित पोस्ट