Breaking News
साखरखेर्डा प्रतिनिधी
सहकारमहर्षी स्व भास्करराव शिंगणे यांची 32 वी पुण्यतिथी भगिरथ मिश्रखत कारखाना परिसरातील समाधीस्थळावर भक्तीमय वातावरणात साजरी झाली,पुण्यतिथी सोहळ्यातील सूत्रसंचालनाला 32 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याबद्दल शिंगणे परिवार शेंदुर्जन आणि बुलडाणा तर्फे प्रख्यात मराठी कवी, नामवंत निवेदक अजीम नवाज राही यांचा सत्कार आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केला.
सहकारमहर्षी स्व भास्करराव शिंगणे यांच्या राजकीय उदयापासून तर त्यांच्या निधनापर्यंत अजीम नवाज राही यांच्या निष्ठेचा पर्यायाने त्यांच्या वाणीचा प्रवास, सहकारमहर्षी स्व भास्करराव शिंगणे यांच्या पहिल्या पुण्यतिथीपासून स्मृतीज्योतीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली, ही महूर्तमेढ रोवण्यात अजीम नवाज राही यांच्यासह जगन्नाथ बोरकर,गौतम खिल्लारे, राजेश दवणे,हिम्मतराव पाटील,डॉ शिवाजीराव निकम,विठोबा किलबिले, छगनराव बाहेकर,आत्माराम गाडेकर,श्रीराम सुसर यांचा समावेश होता,कालांतराने मनिष बोरकर,विशाल फदाट,वैभव हिंगे,संदीप सोनुने,श्रीजीत देशमुख,अमोल टाकले,गजानन मुळे, विजय कऱ्हाडे ही तरुणमंडळी स्मृतीज्योच्या आयोजनात सहभागी झाली,दरसाल ही स्मृतीज्योत भल्यापहाटे राजमाता, राष्ट्रमाता आई जिजाऊच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन सिंदखेडराजा येथून निघून दुसरबीड,बिबी, मलकापूर पांग्रा,शेंदुर्जन,साखरखेर्डा, शिंदी,मेरा,चिखली मार्गे बुलडाणा येथील भगिरथ मिश्रखत कारखाण्याजवळील सहकारमहर्षी स्व भास्करराव शिंगणे यांच्या समाधीस्थळावर पोहोचत असते,सिंदखेडराजा येथून निघणाऱ्या या स्मृतीज्योतीपासून प्रेरणा घेऊन आता सिंदखेडराजा,देऊळगाव कोळ,खामगाव,बोरजवळा येथूनही स्मृतीज्योती निघू लागल्या, उपरोक्त सगळ्या स्मृतीज्योती समाधीस्थळावर पोहोचल्यावर आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या सुपूर्द केल्या जातात,नंतर समाधीस्थळावर सुरू होतो अभिवादन सोहळा,अभिवादन सोहळ्यात भाषणांची परंपरा नाही, प्रास्ताविकाची,मनोगताची,सूत्रसंचालनाची,आभारप्रदर्शनाची जबाबदारी असते एकट्या अजीम नवाज राही यांच्याकडे,उपरोक्त परंपरेला तब्बल 32 वर्षांचा प्रदीर्घ कालावधी उलटला,11 ऑक्टोंबर रोजी सहकारमहर्षी स्व भास्करराव शिंगणे यांच्या पावन पुण्यतिथी सोहळ्यात अजीम नवाज राही यांच्या 32 वर्षीय वाणीच्या प्रवासाची नोंद घेऊन आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांनी सहकारमहर्षी स्व भास्करराव शिंगणे यांची प्रतिमा देऊन अजीम नवाज राही यांचा यथोचित्त सत्कार केला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Darshan Gavai